• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृष्णा नदीपात्राजवळ केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप; अथर्व फाउंड्री कंपनी सील करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
कृष्णा नदीपात्राजवळ केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप; अथर्व फाउंड्री कंपनी सील करण्याची मागणी
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

राख तातडीने हटवून कंपनीवर कारवाई करा; अन्यथा जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी कार्यालयात राख टाकण्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा इशारा

सातारा–वाई : प्रतिनिधी : कृष्णा नदीपात्रापासून अवघ्या शंभर फूट अंतराच्या आत केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप करत वाई एमआयडीसीमधील अथर्व फाउंड्री कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने केली आहे. कंपनी सील करून नदीपात्राजवळ टाकलेली राख तातडीने हटवावी, अन्यथा ही राख जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाई येथे आणून टाकण्यात येईल, असा इशारा पक्षाने निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

RelatedPosts

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

दि. २९ ऑक्टोबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी, सातारा आणि उपविभागीय अधिकारी, वाई यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. वाई एमआयडीसी परिसरात असलेल्या अथर्व फाउंड्री कंपनीत धातू वितळविण्याच्या भट्ट्या असून, त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडते. ही राख केमिकलयुक्त असल्याचा दावा पक्षाने निवेदनात केला आहे. तिची योग्य विल्हेवाट न लावल्यास पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

वाई–पाचवड रस्त्यालगत कृष्णा नदीपात्राच्या शेजारील उताराच्या जागेवर कंपनीकडून ही राख टाकण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यामुळे ही राख नदीपात्रात जाण्याची शक्यता असून, त्यामुळे नदीतील पाणी दूषित होण्याचा धोका असल्याचे पक्षाने म्हटले आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती असताना जलस्रोतांचे प्रदूषण होणे गंभीर असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर राखेची विल्हेवाट लावण्यासाठी कंपनीकडे आवश्यक प्रक्रिया व्यवस्था नसल्याचा तसेच राख टाकण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतलेली नसल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणची पाहणी करावी, राख नदीपात्रापासून हटवावी आणि कंपनीकडून योग्य विल्हेवाटीची व्यवस्था होईपर्यंत कंपनी सील करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी कंपनीत एका महिन्याच्या कालावधीत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. कंपनीच्या कारभाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा तसेच राख जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी कार्यालयात टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे, जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, सनी वाघमारे, अमोल चव्हाण यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Nityanand More
Previous Post

दुष्काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणार; आमदार नरेंद्र दराडे यांचा शेतकऱ्यांना दिलासा

Next Post

पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा

Related Posts

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा
ताज्या घडामोडी

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

October 30, 2026
0
श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत
ताज्या घडामोडी

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

October 30, 2026
1
शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
ताज्या घडामोडी

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

October 30, 2026
1
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर
ताज्या घडामोडी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

October 30, 2026
3
सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
ताज्या घडामोडी

सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

October 30, 2026
0
पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा
ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा

October 30, 2026
0
Next Post
पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा

पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा

ताज्या बातम्या

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

October 30, 2026
श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

October 30, 2026
शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In