५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिजाऊ सभागृहात निवड प्रक्रिया; अध्यक्षपदाबाबत सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
बारामती : प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, बारामती, जि. पुणे यांच्या मुख्य कार्यालयातील जिजाऊ सभागृहात बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार, याबाबत सभासदांसह राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीकडे बारामती तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











