• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

खांडबारा चार रस्त्यांजवळ इंडिका कार खड्ड्यात कोसळली; वाहनाचे मोठे नुकसान, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव

खांडबारा (प्रतिनिधी) :

RelatedPosts

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा

नंदुरबार-विसरवाडी महामार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवण्यात आल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचा धोका वाढत असून, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याबद्दल वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

नुकताच खांडबारा चार रस्त्यांजवळ खोदलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने एक इंडिका कार थेट खड्ड्यात कोसळली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी का घेतली जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. खड्ड्यांभोवती संरक्षक कठडे उभारणे, धोक्याचे सूचना फलक लावणे तसेच रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसतील असे रिफ्लेक्टर बसविणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे.

महामार्गावरील कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्यास वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन संबंधित यंत्रणेमार्फत पाहणी करावी आणि निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, महामार्गावरील खोदलेले खड्डे तातडीने सुरक्षित करण्याची मागणी जोर धरत आहे.

Ad 1
Tags: Manoj Chaudhari
Previous Post

सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

Next Post

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

Related Posts

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला
ताज्या घडामोडी

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

October 30, 2026
1

4
भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा
ताज्या घडामोडी

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा

October 30, 2026
4
भाजपा उत्तर मुंबई जिल्हा भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण
ताज्या घडामोडी

भाजपा उत्तर मुंबई जिल्हा भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण

October 30, 2026
10
AIMIM च्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; कळंब येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

AIMIM च्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; कळंब येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 30, 2026
13
जव्हारच्या अजित महाले यांची रेशीम शेतीत यशाची भरारी!
ताज्या घडामोडी

जव्हारच्या अजित महाले यांची रेशीम शेतीत यशाची भरारी!

October 30, 2026
17
Next Post
खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

ताज्या बातम्या

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

October 30, 2026
नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!

नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!

October 30, 2026
सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In