• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

नंदुरबार–विसरवाडी महामार्गावरील वाहतूक दोन तासांपासून ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ठेकेदाराच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह

खांडबारा (प्रतिनिधी) :

RelatedPosts

नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!

सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा

नंदुरबार–विसरवाडी महामार्गावरील खांडबारा–श्रावणी परिसरात पवनऊर्जेसाठी वापरण्यात येणारे महाकाय पाते वाहून नेणारा अवजड ट्रक बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळील मोठ्या खड्ड्यात अडकल्याची घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक गेल्या दोन तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

महामार्गाच्या कामातील निष्काळजीपणा पुन्हा ऐरणीवर!

नंदुरबार–विसरवाडी महामार्गाचे काम सध्या विविध ठिकाणी सुरू आहे. पुलांच्या बांधकामासाठी ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. मात्र, या कामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा उपाययोजना केल्या जात आहेत का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

यापूर्वी खांडबारा चार रस्त्यांजवळ खोदलेल्या खड्ड्यात इंडिका कार कोसळून अपघात झाला होता. त्या घटनेनंतर आता महाकाय पाते वाहून नेणारा अवजड ट्रक खड्ड्यात अडकल्याने महामार्गावरील वाहतूक नियोजन आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

पर्यायी मार्ग आणि सुरक्षिततेचे नियोजन कुठे?

महामार्गाचे काम सुरू असताना अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले होते का? वाहनांसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता का? बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेड्स आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

आणखी किती अडचणींनंतर प्रशासन जागे होणार?

महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. वाहतूक ठप्प होणे, वाहनांचे नुकसान होण्याचा धोका आणि प्रवाशांचा वेळ वाया जाणे यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून महामार्ग प्रशासनाने तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. बांधकामस्थळी योग्य दिशादर्शक सूचना फलक व बॅरिकेड्स लावावेत तसेच वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आता तरी संबंधित विभाग आणि प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का, की आणखी एखाद्या अपघाताची वाट पाहणार, असा संतप्त सवाल या घटनेनंतर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Ad 1
Tags: Manoj Chaudhari
Previous Post

नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!

Related Posts

नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!
ताज्या घडामोडी

नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!

October 30, 2026
0
सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश
ताज्या घडामोडी

सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

October 30, 2026
2
भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा
ताज्या घडामोडी

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेचा वाराणसी अभ्यासदौरा

October 30, 2026
2
भाजपा उत्तर मुंबई जिल्हा भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण
ताज्या घडामोडी

भाजपा उत्तर मुंबई जिल्हा भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण

October 30, 2026
9
AIMIM च्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; कळंब येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

AIMIM च्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; कळंब येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 30, 2026
12
जव्हारच्या अजित महाले यांची रेशीम शेतीत यशाची भरारी!
ताज्या घडामोडी

जव्हारच्या अजित महाले यांची रेशीम शेतीत यशाची भरारी!

October 30, 2026
17

ताज्या बातम्या

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

खांडबारा–श्रावणीजवळ महाकाय पाते वाहून नेणारा ट्रक खड्ड्यात अडकला

October 30, 2026
नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!

नंदुरबार-विसरवाडी महामार्गावरील खोदलेले खड्डे ठरताहेत अपघातांना निमंत्रण!

October 30, 2026
सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

सैनिक शेतकरी फाऊंडेशनकडून नवजात कन्येला ५ हजारांची आर्थिक मदत; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In