• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूरमध्ये ३०० क्षयरुग्णांना पोषण आहाराचे सहाय्य

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिरूरमध्ये ३०० क्षयरुग्णांना पोषण आहाराचे सहाय्य
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

ऑलिम्पिया ट्रस्ट आणि पर्सिस्टंट फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला बळ

प्रतिनिधी : शिरूर : प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत ऑलिम्पिया ट्रस्ट, पुणे आणि पर्सिस्टंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्सिस्टंट फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्यातून ३०० क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

RelatedPosts

बामखेडा येथे ऑक्टोबर महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!

अंबरनाथ नगरपालिकेत पांडुरंग जाधव यांच्यासह १२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न

क्षयरोगावरील उपचार सुरू असताना रुग्णांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत व्हावी आणि उपचारांचा निर्धारित कालावधी नियमितपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक पोषण सहाय्य मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. औषधोपचारांसोबत योग्य आहार आणि सामाजिक आधार मिळाल्यास रुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी मदत होते.

ऑलिम्पिया ट्रस्टने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागासोबत सामंजस्य करार (MoU) केला असून, त्याअंतर्गत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानासाठी पोषण आहार सहाय्य उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला पर्सिस्टंट फाउंडेशनचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.

यावेळी ऑलिम्पिया ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र पाटणकर म्हणाले, “क्षयरोगमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केवळ औषधोपचार पुरेसे नसून रुग्णांना योग्य पोषण आहार आणि सामाजिक आधार मिळणेही अत्यंत आवश्यक आहे. पर्सिस्टंट फाउंडेशनसारख्या सामाजिकदृष्ट्या जबाबदार संस्थांच्या सहकार्यामुळे गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविणे शक्य होत आहे. आगामी काळात अधिकाधिक कॉर्पोरेट संस्था आणि सामाजिक घटकांना या अभियानाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

शिरूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांचाळ राठोड यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी नियमित औषधोपचार आणि सकस आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. त्यासाठी रुग्णांनी औषधोपचार नियमितपणे पूर्ण करणे, सकस आहार घेणे आणि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाचे पालन करणे आवश्यक आहे. गरजू रुग्णांना उपचारादरम्यान पोषण आहारासाठी मिळणारे सहाय्य त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. अशा सामाजिक उपक्रमांमुळे शासनाच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमेला बळ मिळते.”

या कार्यक्रमास शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक दादाभाऊ लोखंडे, ऑलिम्पिया ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र पाटणकर, उपाध्यक्षा दीपाली सावंत-भोसले, जिल्हा क्षयरोग केंद्राच्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक (DPC) डॉ. अंजली गायकवाड आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांचाळ राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थी रुग्ण उपस्थित होते.

क्षयरोग निर्मूलनासाठी शासन, स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे. अशा संयुक्त उपक्रमांमुळे रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक पोषण सहाय्य मिळण्यास मदत होते. ‘सकस पोषण, सक्षम रुग्ण आणि क्षयरोगमुक्त भारत’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Ad 1
Tags: Avinash Ghogare
Previous Post

अंबरनाथ नगरपालिकेत पांडुरंग जाधव यांच्यासह १२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न

Next Post

पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!

Related Posts

बामखेडा येथे ऑक्टोबर महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

3

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध
ताज्या घडामोडी

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

October 31, 2026
19
सासवडच्या किर्लोस्कर न्यूमॅटिकचा पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सन्मान
ताज्या घडामोडी

सासवडच्या किर्लोस्कर न्यूमॅटिकचा पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सन्मान

October 31, 2026
6
पट्टणकोडोलीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा भक्तिमय उत्साह; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने वेधले भाविकांचे लक्ष
ताज्या घडामोडी

पट्टणकोडोलीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा भक्तिमय उत्साह; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने वेधले भाविकांचे लक्ष

October 31, 2026
5
Next Post
पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!

पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!

ताज्या बातम्या

बामखेडा येथे ऑक्टोबर महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

बामखेडा येथे ऑक्टोबर महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

October 31, 2026
पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!

पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!

October 31, 2026
शिरूरमध्ये ३०० क्षयरुग्णांना पोषण आहाराचे सहाय्य

शिरूरमध्ये ३०० क्षयरुग्णांना पोषण आहाराचे सहाय्य

October 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In