• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासवडच्या किर्लोस्कर न्यूमॅटिकचा पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
सासवडच्या किर्लोस्कर न्यूमॅटिकचा पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सन्मान
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

२०८ अशोक वृक्षांच्या संगोपनाची दखल; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान

पुरंदर (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सासवड इंडस्ट्रियल इस्टेट येथील किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडचा जागतिक स्तरावर सन्मान करण्यात आला आहे. कंपनीने औद्योगिक परिसरात केलेल्या २०८ अशोक वृक्षांच्या लागवड व संगोपनाच्या उपक्रमाची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याकडून प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहेत.

RelatedPosts

अंबरनाथ नगरपालिकेत पांडुरंग जाधव यांच्यासह १२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

पट्टणकोडोलीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा भक्तिमय उत्साह; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने वेधले भाविकांचे लक्ष

कंपनीच्या पर्यावरणपूरक उपक्रमाची माहिती देताना मानव संसाधन विभागाचे प्रमुख गणेश चौधरी यांनी सांगितले की, शाश्वत आणि पर्यावरणपूरक औद्योगिक परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने १९८५ मध्ये कंपनी परिसरात अशोक वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली. दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत ही लागवड पूर्ण करण्यात आली. त्यानंतर गेल्या चार दशकांपासून या वृक्षांची सातत्याने निगा राखण्यात आली. आज या रोपांचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर झाले असून, कंपनी परिसरात २०८ अशोक वृक्ष उभे आहेत.

हे वृक्ष कंपनीच्या परिसराचा अविभाज्य भाग बनले असून, परिसराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनासाठीही योगदान देत आहेत. औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरणाचे रक्षण, हरितक्षेत्राची वाढ आणि जैवविविधतेचे जतन हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

या विक्रमाची नोंद करण्यासाठी वृक्षांची संख्या, लागवडीचे क्षेत्र, वृक्षांची ओळख, छायाचित्रे तसेच आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे यांचे शास्त्रोक्त पद्धतीने दस्तऐवजीकरण करण्यात आले. या प्रक्रियेत पुण्यातील युनिक लॅबने पर्यावरणीय सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

२०८ अशोक वृक्षांचे संगोपन हा केवळ विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न नसून उद्योग आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्याच्या दिशेने उचललेले प्रेरणादायी पाऊल आहे. अशोक वृक्षांचे पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि सौंदर्यात्मक महत्त्व लक्षात घेऊन या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही गणेश चौधरी यांनी सांगितले.

औद्योगिक क्षेत्रात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून त्यांचे दीर्घकाळ संगोपन कसे करता येते, याचे उदाहरण किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीने निर्माण केले आहे. या जागतिक स्तरावरील सन्मानामुळे कंपनीच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना विशेष ओळख मिळाली आहे.

Ad 1
Tags: Suresh Kamthe
Previous Post

पट्टणकोडोलीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा भक्तिमय उत्साह; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने वेधले भाविकांचे लक्ष

Next Post

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

Related Posts

अंबरनाथ नगरपालिकेत पांडुरंग जाधव यांच्यासह १२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न
ताज्या घडामोडी

9

3
‘श्री गुरुदेव’च्या जयघोषाने दुमदुमला गुरुकुंज आश्रम; लाखो भक्तांनी राष्ट्रसंतांना वाहिली मौन श्रद्धांजली
ताज्या घडामोडी

‘श्री गुरुदेव’च्या जयघोषाने दुमदुमला गुरुकुंज आश्रम; लाखो भक्तांनी राष्ट्रसंतांना वाहिली मौन श्रद्धांजली

October 31, 2026
1
केज तहसील कार्यालयातील SIR जनजागृती फलकाची दुरवस्था; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा सवाल
ताज्या घडामोडी

केज तहसील कार्यालयातील SIR जनजागृती फलकाची दुरवस्था; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा सवाल

October 31, 2026
2
सैनिक शेतकरी फाऊंडेशनचा माणुसकीचा हात; स्व. फुलारी कुटुंबाला पाच हजारांची मदत
ताज्या घडामोडी

सैनिक शेतकरी फाऊंडेशनचा माणुसकीचा हात; स्व. फुलारी कुटुंबाला पाच हजारांची मदत

October 31, 2026
8
Next Post
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

ताज्या बातम्या

अंबरनाथ नगरपालिकेत पांडुरंग जाधव यांच्यासह १२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न

अंबरनाथ नगरपालिकेत पांडुरंग जाधव यांच्यासह १२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न

October 31, 2026
शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

October 31, 2026
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरुवात; तीन जागा बिनविरोध

October 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In