• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

शिवसेनेच्या माध्यमातून दिव्यांग, वयोवृद्ध व निराधारांच्या घरी दिवाळीचा शिधा; युवकांनी घरोघरी जाऊन केले किराणा किटचे वाटप

नांदूर घाट, ता. केज, जि. बीड | प्रतिनिधी

दिवाळीच्या झगमगाटात समाजातील शेवटच्या घटकाच्याही घरात आनंदाचा दिवा पेटावा, या सामाजिक भावनेतून नांदूर घाट येथे शिवसेनेच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना केज तालुका सोशल मीडिया प्रमुख कृष्णा परबळे, शिवसेना बीड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आदित्य ठोके आणि प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकारातून गावातील दिव्यांग, वयोवृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना घरोघरी जाऊन दिवाळीच्या किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची भर पडली.

RelatedPosts

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक तसेच केज तालुकाप्रमुख अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

विशेष म्हणजे, केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता कृष्णा परबळे, आदित्य ठोके, प्रथमेश खोमणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट गरजूंच्या दारापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. गावातील दिव्यांग, वयोवृद्ध आणि निराधार नागरिकांची भेट घेऊन त्यांना किराणा साहित्याच्या किट देण्यात आल्या. सणासुदीच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.

या उपक्रमाला मंगेश चिवटे यांचे निकटवर्तीय शिवराज आंधळकर सर तसेच अपंग संघटनेचे अध्यक्ष विशाल नाळपे यांची उपस्थिती होती.

पदापेक्षा माणुसकीला प्राधान्य; युवकांच्या पुढाकाराचे कौतुक

सामाजिक कार्य करताना प्रसिद्धीपेक्षा गरजूंच्या चेहऱ्यावरील समाधान अधिक महत्त्वाचे असते, याचा प्रत्यय या उपक्रमातून आला. गावातील गरजू नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांची दिवाळी आनंदाची करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल कृष्णा परबळे, आदित्य ठोके आणि प्रथमेश खोमणे यांचे नांदूर घाटसह परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे स्थानिक युवक समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. विशेषतः दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना सणासुदीच्या काळात दिलेला मदतीचा हात समाजासाठी सकारात्मक संदेश देणारा ठरला.

गरजूंच्या घरापर्यंत पोहोचलेला मदतीचा हात, हाच खऱ्या अर्थाने दिवाळीचा प्रकाश!

Ad 1
Tags: Sandeep Ghuge
Previous Post

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

Related Posts

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!
ताज्या घडामोडी

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

November 12, 2026
19
अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग
ताज्या घडामोडी

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

November 12, 2026
60
सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!
ताज्या घडामोडी

सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

November 12, 2026
7
दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप
ताज्या घडामोडी

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

November 12, 2026
131
कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप
ताज्या घडामोडी

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

November 12, 2026
11
निपाणी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

निपाणी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

November 11, 2026
47

ताज्या बातम्या

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

November 13, 2026
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

November 12, 2026
अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

November 12, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In