• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 13, 2026
in Blog
0
पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

देवीभोयरे आणि नरसाळवाडी येथे पोलिसांची कारवाई; ७ हजार ८४५ रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात तर दोघे फरार

अहिल्यानगर | प्रतिनिधी

RelatedPosts

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा

पारनेर तालुक्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. १२ नोव्हेंबर रोजी पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवीभोयरे आणि नरसाळवाडी (शिरापूर) येथे करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ७ हजार ८४५ रुपये किमतीचा गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य दोघे फरार झाले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे.

देवीभोयरे येथे एकाला ताब्यात

पहिली कारवाई देवीभोयरे येथे करण्यात आली. यावेळी शंकर देविदास सरडे (वय ३८, रा. देवीभोयरे, ता. पारनेर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर या प्रकरणातील राजू मणियार (रा. वडझिरे, ता. पारनेर) हा फरार झाला आहे.

नरसाळवाडी येथेही कारवाई

दुसरी कारवाई नरसाळवाडी (शिरापूर) येथे करण्यात आली. या कारवाईत प्रताप माणिकचंद गुगळे (वय ५६, रा. नरसाळवाडी, शिरापूर, ता. पारनेर) याला ताब्यात घेण्यात आले. तर आकाश पिंगट (पूर्ण नाव माहीत नाही, रा. चासकरवाडी, ता. पारनेर) हा फरार झाला आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ७ हजार ८४५ रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Ad 1
Previous Post

मेहकर परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात

Related Posts

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे
Blog

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

November 13, 2026
3
येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
Blog

येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

November 13, 2026
1
महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा
Blog

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा

November 13, 2026
22
ढोलाच्या तालावर थिरकला मेळघाट; घुंगरू बाजारात उसळला जनसागर
Blog

ढोलाच्या तालावर थिरकला मेळघाट; घुंगरू बाजारात उसळला जनसागर

November 13, 2026
5
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Blog

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

November 12, 2026
93
Blog

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

November 12, 2026
5

ताज्या बातम्या

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

November 13, 2026
मेहकर परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात

मेहकर परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात

November 13, 2026
भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

November 13, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In