• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ढोलाच्या तालावर थिरकला मेळघाट; घुंगरू बाजारात उसळला जनसागर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 13, 2026
in Blog
0
ढोलाच्या तालावर थिरकला मेळघाट; घुंगरू बाजारात उसळला जनसागर
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

डोक्यावर कलंगी, हातात मुरली अन् पायात घुंगरू; शतकानुशतके जुन्या आदिवासी लोकसंस्कृतीचे अनोखे दर्शन

चुरणी | प्रतिनिधी

दिवाळीनंतर मेळघाटात पारंपरिक ‘घाट्या घुंगरू’ बाजाराची धूम सुरू झाली आहे. बुधवारी हरिसाल आणि चुरणी येथील साप्ताहिक बाजारात आदिवासी लोकसंस्कृतीचे अनोखे दर्शन घडले. आधुनिकतेचा वाढता प्रभाव आणि शहरांकडे वाढती ओढ असतानाही आदिवासी समाजाने आपली शतकानुशतके जुनी परंपरा आजही उत्साहाने जिवंत ठेवली आहे. ढोल, टिमकी, बासरी आणि मुरलीच्या सुरांवर घाट्या कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने बाजारपेठांमध्ये रंगत आणली.

RelatedPosts

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!

हरिसालमध्ये दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी

मेळघाटातील पहिला घुंगरू बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिसाल येथे यंदा मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. चौसेकुंड रोडपासून परतवाडा-धारणी मार्गापर्यंत जवळपास दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बाजारात कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधने, घरगुती साहित्य आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये दिवसभर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती.

घुंगरू बाजाराला सामाजिक परंपरेचीही जोड

घुंगरू बाजार हा केवळ खरेदी-विक्री आणि लोकनृत्यापुरता मर्यादित नाही, तर आदिवासी समाजाच्या सामाजिक परंपरांशीही त्याचा जवळचा संबंध आहे. या बाजाराच्या निमित्ताने तरुण-तरुणी एकमेकांना पसंत करतात आणि पुढे कुटुंबीयांच्या संमतीने विवाहाचे संबंध जुळतात. त्यामुळे हा बाजार सामाजिक भेटीगाठी, नातेसंबंध आणि सांस्कृतिक ओळख जपणारे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.

या ठिकाणीही रंगणार घुंगरू बाजार

मेळघाटातील कोलकास येथे १२ नोव्हेंबर, धारणी येथे शुक्रवार आणि डेढतलाई येथे १५ नोव्हेंबर रोजी साप्ताहिक बाजाराच्या निमित्ताने पारंपरिक घुंगरू बाजाराची रंगत अनुभवायला मिळणार आहे.

पारंपरिक वेशभूषेने वेधले सर्वांचे लक्ष

गोंड आदिवासी समाजातील घाट्या कलाकार पांढरे वस्त्र, पारंपरिक धोतर, डोक्यावर कलंगी, गळ्यात कवड्यांची माळ आणि पायात घुंगरू अशा पारंपरिक वेशभूषेत बाजारात दाखल झाले होते. हातात मुरली आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. घरांसमोर, दुकानांमध्ये तसेच गावातील चौकाचौकांत कलाकारांच्या समूहांनी पारंपरिक सादरीकरणे केली.

आधुनिकतेच्या युगातही आदिवासी समाजाने आपल्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन केले असल्याचे या घुंगरू बाजारातून पुन्हा एकदा दिसून आले. ढोलाच्या तालावर थिरकणारा मेळघाट आणि घुंगरूंच्या निनादाने दुमदुमलेल्या बाजारपेठांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

Ad 1
Previous Post

स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

Related Posts

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Blog

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

November 12, 2026
77
Blog

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

November 12, 2026
3
समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!
Blog

समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!

November 12, 2026
13
सिगालोवाद सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनाला धम्माची दिशा!
Blog

सिगालोवाद सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनाला धम्माची दिशा!

November 12, 2026
18
बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम
Blog

बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम

November 11, 2026
16
सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप
Blog

सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप

November 11, 2026
62

ताज्या बातम्या

ढोलाच्या तालावर थिरकला मेळघाट; घुंगरू बाजारात उसळला जनसागर

ढोलाच्या तालावर थिरकला मेळघाट; घुंगरू बाजारात उसळला जनसागर

November 13, 2026
स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

November 13, 2026
कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

November 13, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In