• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

तिवसा येथील घटना; विजेचा धक्का लागून १५ फुटांवरून पडला, पुढील उपचारासाठी अमरावतीत दाखल

तिवसा | प्रतिनिधी :

तिवसा शहरातील सॉफ्ट कॉर्नर परिसरात नादुरुस्त रोहित्राची दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या एका खासगी मजुराला विजेचा जोरदार धक्का लागून तो खांबावरून खाली पडल्याची घटना सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता घडली. या दुर्घटनेत मजूर गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर वामनराव इंगळे (वय ४८, रा. सुरवाडी, तिवसा) असे जखमी मजुराचे नाव आहे.

RelatedPosts

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

विज्ञान प्रदर्शनातील समयसूचक भाषण स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या पलकचे घवघवीत यश

राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सॉफ्ट कॉर्नर परिसरात नवीन लेआउट असून, येथील एका रोहित्रावरून सुमारे २५ नागरिकांना वीजपुरवठा केला जातो. सोमवारी सकाळपासून या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी लाईनमन कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. मात्र, संबंधित कर्मचारी रजेवर असल्याने एका खासगी मजुराला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सांगण्यात आल्याचे समजते.

त्यानुसार ज्ञानेश्वर इंगळे रोहित्राजवळ गेले आणि विद्युत खांबावर चढले. काही क्षणांतच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते सुमारे १५ फूट उंचीवरून खाली कोसळले. या घटनेत त्यांच्या एका पायाला भाजल्याची, तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर त्यांना तातडीने तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे वीज वितरण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

चौकशी करून दोषींवर कारवाई करणार : सहाय्यक अभियंता

“संबंधित घटनेची कोणतीही माहिती मला नव्हती. जखमी व्यक्ती कोणाच्या सांगण्यावरून विद्युत खांबावर गेले, याची सविस्तर चौकशी केली जाईल. जखमी व्यक्तीचे लेखी बयान घेण्यात येईल. चौकशीत कर्मचारी दोषी आढळल्यास निश्चितच कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती तिवसा येथील सहाय्यक अभियंता रमेश कुमार मिश्रा यांनी दिली.

Ad 1
Tags: Manish Mahore
Previous Post

विज्ञान प्रदर्शनातील समयसूचक भाषण स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या पलकचे घवघवीत यश

Next Post

३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Related Posts

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण
ताज्या घडामोडी

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

November 24, 2026
3
३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन
ताज्या घडामोडी

३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

November 24, 2026
2
विज्ञान प्रदर्शनातील समयसूचक भाषण स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या पलकचे घवघवीत यश
ताज्या घडामोडी

विज्ञान प्रदर्शनातील समयसूचक भाषण स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या पलकचे घवघवीत यश

November 24, 2026
1
शेअर बाजारात मोठी घसरण; सोने-चांदीच्या दरात मात्र तेजी
ताज्या घडामोडी

शेअर बाजारात मोठी घसरण; सोने-चांदीच्या दरात मात्र तेजी

November 24, 2026
6
रविकांत तुपकर यांच्या दुष्काळग्रस्त संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद
ताज्या घडामोडी

रविकांत तुपकर यांच्या दुष्काळग्रस्त संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

November 24, 2026
9
ताज्या घडामोडी

मुक्ताईनगर शहरात ‘नो एन्ट्री’चा बोजवारा; अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

November 24, 2026
12
Next Post
३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

November 24, 2026
३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

November 24, 2026
विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी

विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In