• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान दररोज दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

खोपोली | वार्ताहर :

धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकई (माजगाव), ता. खालापूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खोपोली परिसरात जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही बंदी २१ नोव्हेंबर २०२६ ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

RelatedPosts

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताकई येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात दरवर्षी पंधरा दिवसांचा यात्रोत्सव भरतो. या काळात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. यात्रेत महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग असतो. मंदिर परिसर खोपोली-पेण मार्गालगत असल्याने औद्योगिक मालाची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.

या मार्गांवरील जड वाहनांना बंदी

खोपोली-पाली मार्गावर पाली बाजूकडून साजगावमार्गे खोपोलीकडे येणारी जड व अवजड वाहतूक (पाली फाटा/इंसाबा फाटा), तसेच खोपोली-पेण मार्गावर पेण बाजूकडून इंसाबा फाटामार्गे खोपोलीकडे येणारी जड वाहतूक बंद राहणार आहे. याशिवाय खोपोलीकडून पाली व पेण मार्गावर जाणाऱ्या जड वाहनांनाही शिळफाटा ते इंसाबा फाटा या दरम्यान निर्बंध लागू असतील.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

पाली व पेण बाजूकडून येणाऱ्या वाहनांसाठी पुढील पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत :

१. पाली फाटा – इंसाबा फाटा – सावरोली – सावरोली चार फाटा – खालापूर फाटा.

२. पाली फाटा – इंडियाबुल्स एक्स्प्रेसवे अंडरपास – सावरोली चार फाटा – खालापूर फाटा.

खोपोली शिळफाटा येथून पाली व पेणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी :

शिळफाटा – खालापूर फाटा – सावरोली चार फाटा – एक्स्प्रेसवे अंडरपास – पेण/पाली मार्गे.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना सूट

दूध, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

यात्रा कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी बंदीच्या वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

Ad 1
Tags: Pradip Satane
Previous Post

सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन

Next Post

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

Related Posts

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा
ताज्या घडामोडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026
2
सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन
ताज्या घडामोडी

सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन

November 24, 2026
6
गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण
ताज्या घडामोडी

गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण

November 24, 2026
11
३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन
ताज्या घडामोडी

३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

November 24, 2026
4
विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

विद्युत खांबावरून पडून खासगी मजूर गंभीर जखमी

November 24, 2026
2
विज्ञान प्रदर्शनातील समयसूचक भाषण स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या पलकचे घवघवीत यश
ताज्या घडामोडी

विज्ञान प्रदर्शनातील समयसूचक भाषण स्पर्धेत राजश्री ग्लोबल स्कूलच्या पलकचे घवघवीत यश

November 24, 2026
3
Next Post
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

ताज्या बातम्या

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026
धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी

धाकटी पंढरी ताकई यात्रोत्सवानिमित्त खोपोली परिसरात जड वाहनांना वाहतूक बंदी

November 24, 2026
सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन

सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण; अमरावती महापालिकेत कामबंद आंदोलन

November 24, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In