श्री रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात सत्कार; शहर व तालुक्यातील विविध पक्ष-संघटनांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
माहूर | प्रतिनिधी :
नांदेड जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी माहूर येथे श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर माहूर येथील शासकीय विश्रामगृहात माहूर तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पटोले यांच्या हस्ते माहूर शहर व तालुक्यातील विविध पक्ष आणि संघटनांतील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये माहूर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील श्रीमती शेख पाकिजाबी शेख मुसा, शेख मुस्ताक शेख मुसा, शेख जैनिसार शेख फकीर आणि शेख अन्सार शेख मुसा यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक २ मधील अनिल नामदेव कांबळे व आदित्य अनिल कांबळे यांनीही पक्षात प्रवेश केला.
तसेच गुंडवळ येथील नितीन खरात, बाबू खंदारे व आकाश प्रकाश जमदाडे, तांदळा येथील सैय्यद आदिम, तर अनमाळ येथील ज्ञानेश्वर रेवासिंग चव्हाण यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माहूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, युवक काँग्रेसचे विठ्ठल राठोड आणि सेवादलाचे तालुकाध्यक्ष राजू राठोड यांनी तालुक्यात विविध ठिकाणी संपर्क मोहीम राबवली आहे. गावागावांत आणि शहरात जाऊन शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या जात असून, या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला नांदेड उत्तरचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, काँग्रेस नेते अनिल पाटील चिमेगावकर, बालाजी चव्हाण आणि माधव पाटील पवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माहूर तालुका काँग्रेस अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष किशन राठोड, माहूर नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा सौ. अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष राजू भिकू राठोड, युवक काँग्रेसचे विठ्ठल राठोड, जगदीश पाटील तुपदाळे, कृष्णकुमार राठोड, जयकुमार पाटील आडकीने, जब्बार शेख, सैय्यद नूर, सचिन बेहेरे, राजू सौंदलकर, शेख सादिक, शेख मोबिन, शरीफ शेख, करीम शाह, अजिम सैय्यद, संजय गायकवाड, उत्तम भिकू राठोड, सावंत बळीराम चव्हाण, रजनीकांत भारत चव्हाण, जीवन उत्तम चव्हाण, आकाश बलवंत चव्हाण, बलदेव गिरधारी, आशिष वसंत राठोड, मंगेश संजय राठोड, अतिष रमेश राठोड, अविनाश प्रकाश जमदाडे, देवानंद कैलास कांबळे, विनोद नथ्थू पाईकराव, नाना गोविंदा कांबळे, मोहन कनिराम आडे, रामसिंग वसराम नाईक, संजय मंगू चव्हाण, प्रदीप उत्तम राठोड, राजू वाघू कांबळे, पंकज गजानन पाईकराव, महेश अरविंद पाईकराव आणि हिरामण तुकाराम वाघमारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










