• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिव्यांगांच्या सन्मानासाठी आराईत प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची नवी सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
दिव्यांगांच्या सन्मानासाठी आराईत प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची नवी सुरुवात
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

शाखेच्या नामफलकाचे अनावरण; तेजस आहिरे यांच्याकडे शाखाध्यक्षपदाची जबाबदारी

आराई, ता. बागलाण | प्रतिनिधी :

समाजातील दिव्यांग बांधवांना केवळ सहानुभूती नव्हे, तर समान संधी, सन्मान आणि न्याय मिळावा, या उद्देशाने आराई येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या नामफलकाचे अनावरण करून शाखेच्या कार्याला सुरुवात करण्यात आली.

RelatedPosts

देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड

पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा

प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या कार्याला आराईतून नवी दिशा मिळणार आहे. संस्थेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष ललित भाऊ पवार यांच्या हस्ते शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी गणेश काकुळते, हिम्मत माळी, माधव शिरसाठ, शेखर परदेशी, प्रकाश पगार, निंबा जाधव, निकम सर, जिभाऊ देवरे, प्रवीण वाघ आणि राकेश तटकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आराई शाखेच्या नूतन कार्यकारिणीमध्ये तेजस आहिरे यांची शाखाध्यक्षपदी, देविदास जाधव यांची उपाध्यक्षपदी, सुनील सु. आहिरे यांची संघटकपदी, बाजीराव महिरे यांची खजिनदारपदी, स्वाती सोनवणे यांची सचिवपदी, तर भालचंद्र सोनवणे यांची कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून देणे, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, रोजगार आणि स्वावलंबनासाठी मार्गदर्शन करणे तसेच त्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला बाळासाहेब आहिरे, रत्ना बच्छाव, रवींद्र सोनवणे, पुंजाराम भामरे, पूनम आहिरे, राजाराम सोनवणे, राहुल सोनवणे, नरेंद्र सोनवणे, जयश्री आहिरे यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयाचे लिपिक स्वप्नील चंद्रकांत आहिरे, गणेश संदीप देवरे आणि महेश कैलास आहिरे यांनीही उपस्थिती दर्शविली.

दिव्यांग बांधवांना समाजात सन्मानाने जगता यावे आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीत संघटनेने खंबीरपणे साथ द्यावी, या उद्देशाने आराई शाखेच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला.

Ad 1
Tags: swapnil ahire
Previous Post

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा

Next Post

पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

Related Posts

देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड
ताज्या घडामोडी

हेरवाड हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात
ताज्या घडामोडी

हेरवाड हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात

November 25, 2026
0
२६ नोव्हेंबर रोजी देशभरात भारतीय संविधान दिन साजरा; संविधानाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम
ताज्या घडामोडी

२६ नोव्हेंबर रोजी देशभरात भारतीय संविधान दिन साजरा; संविधानाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

November 25, 2026
1
ताज्या घडामोडी

पनवेल-कर्जत नव्या रेल्वे कॉरिडॉरचा महत्त्वाचा टप्पा १५ डिसेंबरला पूर्ण होणार

November 25, 2026
2
Next Post
पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

ताज्या बातम्या

देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड

देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड

November 25, 2026
पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

November 25, 2026
दिव्यांगांच्या सन्मानासाठी आराईत प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची नवी सुरुवात

दिव्यांगांच्या सन्मानासाठी आराईत प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची नवी सुरुवात

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In