• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

उद्या पातूर तहसील कार्यालयात आढावा बैठक; टँकर, विहीर अधिग्रहण आणि पर्यायी जलस्रोतांबाबत होणार चर्चा

पातूर | प्रतिनिधी :

खरीप हंगामातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उद्धवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. पातूर तालुक्यातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात प्रशासकीय यंत्रणेची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.

RelatedPosts

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड

पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

खरीप हंगामात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पातूर तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन आणि पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी उपाययोजना आतापासूनच निश्चित करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने आमदार नितीन देशमुख यांनी तहसीलदारांसह संबंधित प्रशासकीय यंत्रणेला सविस्तर माहिती व अहवालासह बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

गुरुवारी सकाळी ११ वाजता पातूर तहसील कार्यालयात ही बैठक होणार आहे. यामध्ये तालुक्यातील धरणे, तलाव आणि नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, त्यांची कार्यक्षमता, उपलब्ध पाणी आणि भविष्यातील संभाव्य गरज यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, अत्यावश्यक परिस्थितीत खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर करण्याबाबत बैठकीत नियोजन केले जाणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने आणि प्रभावीपणे वापर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आतापासूनच सज्ज राहावे, हा या बैठकीमागील प्रमुख उद्देश आहे.

Ad 1
Tags: Pramod dongre
Previous Post

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

Related Posts

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण
ताज्या घडामोडी

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

November 25, 2026
2
देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड
ताज्या घडामोडी

देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड

November 25, 2026
2
पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार
ताज्या घडामोडी

पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

November 25, 2026
2
दिव्यांगांच्या सन्मानासाठी आराईत प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची नवी सुरुवात
ताज्या घडामोडी

दिव्यांगांच्या सन्मानासाठी आराईत प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची नवी सुरुवात

November 25, 2026
10
कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतचा रस्ता झाला मोकळा

November 25, 2026
3
हेरवाड हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात
ताज्या घडामोडी

हेरवाड हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात

November 25, 2026
0
Next Post
कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

ताज्या बातम्या

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

November 25, 2026
कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

November 25, 2026
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In