डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन; विकासकामांची केली पाहणी
महाड | प्रतिनिधी
भारतीय संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि चवदार तळे येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्मारकास पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच चवदार तळे परिसरातील विकासकामांची पाहणी केली.
या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे, रायगड जिल्हा सभापती चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्ष सुनील कविसकर, विकास गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या निमित्ताने महाड येथे संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी रायगड जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पत्रकारांनीही संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.









