प्रो. डॉ. नवनाथ काशीद यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे संविधान दिनी प्रकाशन
केज | प्रतिनिधी :
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, आडस संचलित बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज येथे कार्यरत वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नवनाथ काशीद यांनी संपादित केलेल्या ‘पर्यावरण व मानवी जीवन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला.
पर्यावरणातील समस्या आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर आधारित या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संतोष तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ते बीड येथील श्रीमती केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अनिल किर्दंत होते.
या वेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. तुळशीदास बिडवे, डॉ. सरसरे, डॉ. सचिन शिंदे, ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. आशा बोबडे, वाणिज्य विभागाचे डॉ. सुधीर आगळे, डॉ. प्रमोद काळम आणि डॉ. महादेव कांबळे उपस्थित होते.











