• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

मुख्य कार्यकारी अधिकारी झेनित चंद्रा दोंतुला यांच्या हस्ते चित्ररथ व एलईडी मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी

गोंदिया | प्रतिनिधी :

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), महाराष्ट्र अंतर्गत सन २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘आरोग्य संवाद यात्रा – आरोग्याचा संवाद, जनतेच्या दारी’ या राज्यस्तरीय जनजागृती उपक्रमाचा गोंदिया जिल्ह्यात २६ नोव्हेंबर २०२६ रोजी शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनित चंद्रा दोंतुला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या हस्ते चित्ररथ व एलईडी मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

RelatedPosts

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

या वेळी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, विस्तार अधिकारी मिलिंद नंदागवळी, प्रसिद्धी विभागाचे प्रशांत खरात, काळे, लिचडे, कल्याणी चौधरी यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती सर्वसामान्य तसेच ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या मोहिमेत चित्ररथाद्वारे कलाकारांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. तसेच एलईडी मोबाईल व्हॅनद्वारे आरोग्यविषयक माहितीपट आणि शासकीय योजनांचे व्हिडिओ दाखविण्यात येणार आहेत. ही व्हॅन जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती करणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी झेनित चंद्रा दोंतुला यांनी सांगितले की, शासनाच्या अनेक आरोग्य योजना सर्वसामान्यांच्या हितासाठी आहेत; मात्र माहितीअभावी अनेक नागरिक त्यापासून वंचित राहतात. ‘आरोग्य संवाद यात्रा’ हा उपक्रम आरोग्य सेवा आणि योजनांची माहिती थेट ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरेल. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना आणि शासकीय योजनांची अचूक माहिती पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. चित्ररथ आणि एलईडी व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी आजारांवरील उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. या यात्रेच्या माध्यमातून माता-बाल संगोपन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवरील उपचार आणि जिल्हा रुग्णालयातील विविध सुविधांची माहिती नागरिकांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ad 1
Tags: Mukesh Bopche
Previous Post

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

Related Posts

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक
ताज्या घडामोडी

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

November 27, 2026
0
नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले
ताज्या घडामोडी

नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले

November 27, 2026
12
संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
ताज्या घडामोडी

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

November 27, 2026
1
कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर
ताज्या घडामोडी

कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

November 27, 2026
1
दुष्काळात धाराशिव जिल्ह्यातील ६७ हजार ८०० रेशन लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद
ताज्या घडामोडी

दुष्काळात धाराशिव जिल्ह्यातील ६७ हजार ८०० रेशन लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद

November 27, 2026
4
अहिल्यानगरच्या ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,४५० रुपये दर जाहीर
ताज्या घडामोडी

अहिल्यानगरच्या ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,४५० रुपये दर जाहीर

November 27, 2026
7

ताज्या बातम्या

गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

November 27, 2026
मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

November 27, 2026
नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले

नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In