दौंड तालुका प्रतिनिधी- काल ता.९.चौफुला,ता.दौंड येथे छत्रपती शासन भवन संघर्ष योद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील जनसंपर्क मध्यवर्ती कार्यालयचा उद्घाटन सोहळा ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर ) यांच्या हस्ते संपन्न झाला.
आरोग्य शिबिर व रक्तदान
यावेळी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन मराठा सेवक राजाभाऊ तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
जनतेची लक्षणीय उपस्थिती
या आरोग्य शिबिरात दौंड तालुक्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला तसेच रक्तदानाला सुद्धा विशेष उपस्थिती लाभली त्या सर्व रक्तदात्यांचे मराठा सेवकांनी खूप आभार मानले
तसेच प्रत्येक रक्तदात्यास सर्टिफिकेट व एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. मोफत चष्मे वाटप,व विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात आले.
सन्मान व गुणगौरव सोहळा
या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला ,यामध्ये माजी सैनिक ,शिक्षक ,वारकरी संप्रदाय ,क्रीडा क्षेत्र , डॉक्टर,वकील,आशासेविका, दिव्यांग व्यक्ती व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात सन्मान करण्याची दौंड तालुक्यातील ही पहिलीच वेळ असावी असे जनतेमध्ये बोलले जात होते.
दौंड तालुक्यातील व इतर तालुक्यातील बांधवांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्यासाठी दौंड तालुका व आजूबाजूच्या तालुक्यातून बहुसंख्य जनता उपस्थित होती. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत जनसंपर्क कार्यालयाला लोकांचे भेट देणे चालूच होते.
विशेष सन्मानचिन्ह व शाही पगडी चे मानकरी
प्मुख उपस्थिती लाभलेले शिलेदार
१)मा. कुणाल दादा मालुसरे – —(सुभेदार तानाजी बाबा मालुसरे वंशज)
२)मा. राजाभाऊ पासलकर— (वीर बाजी पासलकर वंशज)
३)मा. दीपक राजे शिर्के— (महाराणी येसूबाई साहेब वंशज)
४)मा. सचिन दादा भोसले पाटील— (प्रदेशाध्यक्ष छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान शिलेदार गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य)
५)मा. अनिकेत दादा शिंदे सरकार —(विभाग प्रमुख श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पर्वती)
६)मा. विशाल सिंह मोहिते— (हंबीरराव सरसेनापती हंबीरराव यांचे वंशज)
७) यशोधन राजे उर्फ शंभूराजे यशवंत वाघोले पाटील —(राजेधार पवार)
या मान्यवरांचा शाही पगडी घालून सन्मान करण्यात आला.यावेळी सर्वच क्षेत्रातील बांधव,सेवक उपस्थित होते.
Discussion about this post