हातकणंगले प्रतिनिधी :- पट्टणकोडोली,
नवरात्र उत्सवामध्ये पट्टणकोडोली गावचे ग्रामदैवत भगवंत श्री कल्लेश्वर या ठिकाणी नऊ दिवस साक्षात शिवाचा अवतार असलेले कल्लेश्वर मंदिर विविध पूजाने व धार्मिक कार्यक्रमाने गजबजुन गेला होता.
शेवटची माळ या दिवशी भजनी मंडळ यांच्यामार्फत मंदिरामध्ये देवाची शिव पार्वती रूपातील पूजा करून भजन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी गावातील अनेक नवरोत्कारी तसेच भक्तजन कमिटी व भक्तगण हजर होते.
तबला – अशोक शिंदे,
हार्मोनियम – निलेश सुतार
आनंदा कोळी,दिलीप लोहार,कुमार लोहार,शिवाजी पाटील,अशोक जाधव व भरत मोरे यांची आज भजन सेवेने नवरात्र उत्सवाची हरी जागर ने सांगता झाली..
Discussion about this post