पलूस ; राज्य सरकारने राज्यात लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंबलात आणली.या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना घेता यावा यासाठी प्रशासनाने अंगणवाडी सेविकामार्फत ही योजना सर्व स्तरावर राबविण्यात अली
माञ या योजनेतील रक्कम मिळण्यासाठी कोणती एक तारीख निश्चित नसल्यामुळे सुरूवातीला अर्ज भरून देखील अजूनपर्यंत या योजनेचा लाभ न मिळाल्याने लाडक्या बहिणीनी नाराजी व्यक्त केली आहे अर्ज अडाणी मिळणारा लाभ याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे येणारा सण साजरा कसा करता
येईल ? या चितेत महिला असून या लाडक्या बहीणीच्या पदरी नाराजी अली आहे . राज्य सरकारने राज्यातील लाडकी बहिण योजना सुरू केली सुरूवातीला योजना कार्यान्वित करण्यासाठी महिला वर्गाच्या खात्यात 1500/-₹ जमा होणार होते.
तर योजनेला मुदतवाढ दिल्याने उशिरा अर्ज करणार्या महिला वर्गाच्या खात्यात दोन महिन्याचे एकञ 3000/-₹ जमा होणार होती.
माञ सप्टेंबर महीना उलटून ऑक्टोबर आला तरी देखील महीलाच्या खात्यात अजून एक ही हप्ता जमा झाल्याची ओरड या बहीणीच्याकडून कली जात आहे तरी पैसे मिळतील का ? या प्रतिक्षेत महीला वर्ग आहे.
Discussion about this post