ज्ञानेश्वर विद्यालय बेगमपुरा, येथे कै.पंढरीनाथ पाटील उर्फ भाऊ ढाकेफळकर सभागृहात माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
यानिमित्त प्रशालेत वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या मोरे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सुनील भडके,मार्गदर्शक श्री.संभाजी तांगडे यांची उपस्थिती तर प्रमुख वक्ते म्हणून श्री.सचिन जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.भरत झोडपे यांनी केले.
यावेळी विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर भाषणे केली.स्पर्धेनंतर प्रमुख वक्ते श्री.सचिन जाधव यांनी तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.सुनील भडके व श्री.संभाजी तांगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार श्रीम.शरयू बोरगावकर यांनी मानले.
यानंतर विद्यार्थ्यांना ग्रंथालयातर्फे विविध पुस्तकांचे वाचनासाठी वाटप करण्यात आले.व प्रामुख्याने ‘श्यामची आई’ या कथेचे प्रकट वाचन करण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी श्री.प्रमोद कापडणे,श्री.विनय बढे,श्री अच्युत औटे,श्री.राजकुमार देगलूरकर,डॉ.रवींद्र साठे,श्री.नितीन भारती,शिक्षिका श्रीम.स्वाती महाजन, श्रीम.नंदा मुडपे,श्रीम.डॉ.सोनाली राठोड,श्रीमती आरती बिरोटे,श्रीम.अर्चना हजारे, श्री.अतुल चव्हाण श्री.बाप्पासहेब गोर्डे ,श्री.वैजीनाथ मोरे, श्री.प्रकाश शिंदे यांची उपस्थिती होती.
Discussion about this post