कारंजा….. दि.11/10/2024 ला संताजी सांस्कृतिक सभागृह भूमिपूजनाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे आर्वी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री दादारावजी केचे यांच्या शुभहस्ते पार पडला. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. स्वाती भिलकर, नगर उपाध्यक्ष भगवान बोवाडे, संताजी क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटीचे अध्यक्ष अरविंद चरडे, उपाध्यक्ष राजेंद्र वंजारी, संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेश काळबांडे, उपाध्यक्ष सुदिप भांगे, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, तालुकाध्यक्ष सुनिल वंजारी, शिवसेना शिंदे गटाचे नेते नितीन दर्यापुरकर, नगरसेवक संजय मस्के, कमलेश कठाणे, हेमराज भांगे, राजेंद्र लाडके, विशाल ईंगळे, संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळाचे संचालक अरुण चाफले, भागवत लोखंडे, जेष्ठ नागरिक लक्ष्मणराव भांगे, शामराव मस्के, मुकुंदराव बारंगे, दिवाकरराव भांगे,
रामदास सावरकर, संत ज्ञानेश्वर माऊली देवस्थानचे अध्यक्ष ताराचंद चाफले, केशवराव जसुतकर, रमेश भांगे, वसंत भांगे, शिवसेना नेते संदिप टिपले, पुरुषोत्तम अग्रवाल, प्रमोद चव्हाण, विजय येनुरकर, गजु भिलकर, मनोज चाफले, राजु चाफले, नारायण भिवगडे, विठ्ठल सरोदे, पुंडलिक चाफले, सुनिल ईंगळे, सुमित बारई, पत्रकार भुपेश बारंगे तसेच संताजी पतसंस्था चे संचालक मंडळ कारंजा त्याचप्रमाणे कारंजा येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बांधकामाकरिता माननीय दादारावजी केचे यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे समस्त तेली बांधव यांच्याकडून त्यांचे आभार मानले जात आहे.
Discussion about this post