रांजणगाव गणपती प्रतिनिधी
जि .प. प्रा. शाळा रांजणगाव गणपती येथे महाभोंडला कार्यक्रम संपन्न झाला यामधे शाळेतील सर्व शिक्षिका,शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनीसह महीला पालकवर्ग मोठ्या संख्येत सहभागी झाला होता.
सुरुवातीला पुजा करून कार्यक्रम सुरु झाला यामधे नवरात्र स्पेशल व गरबा नृत्य व गाण्याच्या ठेक्यावर बालचमूंनी नृत्य केले व आनंद घेतला . यामधे महाभोंडला नियोजन इ. ३ री शिक्षिका व विद्यार्थीनींनी केले . सौ .मंगल शिंदे , सौ .सुरेखा गायकवाड , सौ .विश्वमाला कारखिले , सौ .रासकर मॅडम यांनी केले . यामधे सहकार्य व नियोजन यासाठी सौ . हौसाबाई चोरे मॅडम, सौ पुष्पलता थोरात , सौ उत्कर्षा वाळके , सौ . सीमा खैरे , श्रीम अनुराधा जगताप , सौ योगिता लंघे, सौ कांचन वेताळ यांनी सहकार्य केले . यावेळी मुख्याध्यापक श्री लक्ष्मण जगताप , श्री सुरेश थोरात , श्री पंडित वेताळ , श्री संजयकुमार वाळके , श्री सुभाष चव्हाण श्री श्रीकृष्ण डहाळे यांनीही नियोजन व संयोजन केले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल वाघुले, ग्रंथालय संघ शिरूर तालुकाअध्यक्ष विवेकानंद फंड यांची सदर कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.
Discussion about this post