व.ब.आघाडी.
सारथी महाराष्ट्राचा.
शेख मोईन (ता. प्र.)
कीनवट…आज दि.19/10/2024 रोजी वंचित बहुजन आघाडी या पक्षा तर्फे कीनवट/माहुर विधान सभा मतदार संघासाठी जाहीर करण्यात आलेले उमेदवार प्रा.विजय किशनराव खूपसे यांनी पत्रकार परिषदत आयोजित केली असताना या पत्रकार परिषदेस संबोधित करतांना प्रा.हमराज उईके (प्रवक्ता व.ब.आघाडी) यांनी आपली भूमिका मांडत असताना मागील 20/25 वर्षा पासून केवळ दोनच व्यक्ती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत व” इस जंगल के हम दो शेर” अशी म्हण प्रचलित करत आहेत,
ही म्हण या विधानसभा निवडणुकीत मी नक्कीच मोडीत काढेन असा ठाम विश्वास प्रा. हमराज उईके सरांनी बोलून दाखविला तसेच वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार मा.विजय जी खूपसे सरांनी किमान 35 वर्षा आगोदर दिगवंत आमदार पाचपुते साहेबांनी जी सूतगिरणी,जीनिंग असे अनेक प्रकल्प आपल्या मतदार संघात आणले होते पण या आजी व माजी निष्क्रिय आमदारा मुळे ना ते प्रकल्प टिकू शकले व ना बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकले,
केवळ टक्केवारी कशी मिळेल या कडेच दोन्ही ही आमदारांनी लक्ष केंद्रित केले,त्या मुळेच आता वंचित बहुजन आघाडी पक्षा तर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मी स्वतः विधान सभा निवडणुकीत सर्व ताकती निशी उतरलो असून या निवडणुकीत मी नक्कीच विजयी होईल व मतदार संघाचां सर्वोतोपरी विकास करेन असे ठाम मत प्रा.विजय जी खूपसे यांनी मांडले आहे, या पत्रकार परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष निखिल जी वाघमारे,राजू शेळके,राहुल चौदंते,तसेच अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
Discussion about this post