4 Total Views , 1 views today

प्रतिनिधी :- राजेंद्र शिंदे
भिगवण : निवडणुकांचे वेध लागले तसे तसे इंदापूर मतदार संघात बऱ्याच घडामोडींना वेग येऊ लागला. इंदापूर तालुक्यात चुरशीची लढत होणार, एकेकाळी इंदापूर तालुका हर्षवर्धन पाटील यांचा गड मनाला जायचा पाटील यांची इंदापूर तालुक्यात एकहाती सत्ता होती परंतु पुढील काळात अजित दादा पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना पुणे जिल्हा अध्यक्षपदी संधी दिली आणि पाठबळ दिले पुढे 2014 व 2019 च्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला व हर्षवर्धन पाटील यांना पराभव पत्करावा लागला .बारामती तालुका शेजारी असल्याने राजकीयदृष्ट्या इंदापूर तालुका नेहमीच चर्चेत राहिला . हर्षवर्धन पाटील यांनी 2014 सली काँग्रेसकडून व त्यानंतर 2019 साली भाजपकडून उमेदवारी मिळवली होती या दोन्ही वेळी पाटील यांचा पराभव झाला. 2024 विधानसभेपूर्वी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळावली त्यामुळे शरदचंद्र पवार गटातील निष्ठावान नेते व कार्यकरते नाराज झाले प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा यांनी बंडाचा पवित्र घेत अपक्ष उमेदवार देऊन निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. अपक्ष उमेदवार म्हणून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा आहे. प्रविण माने पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरत असले तरी त्याचा चाहता वर्ग भरपूर आहे व त्याच्या मागे असंख्य कार्यकर्ते आहेत.
त्यामुळे इंदापूर तालुक्यात
विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट
हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट
प्रवीण भैय्या माने अपक्ष
अशी तिरंगी लढत होणार त्यामुळे इंदापूर तालुका चांगला चर्चेत आला आहे. दर दहा वर्षानी इंदापूर तालुक्यात बदल घडत असतो 1995 साली शरद पवार यांनी गणपत पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती व त्यावेळी हर्षवर्धन पाटील निवडून आले होते 1995 सलाची पुनरावृत्ती 2024 साली होते का अशी चर्चा देखील इंदापूर तालुक्यात रंगू लागली आहे. पाटील व माने यांच्यात मराठा समाजातील मते विभागली जातील व भरणे यांच्या पाठीशी धनगर समाज कायम उभा राहत आहे व यावेळी देखील राहील या सर्व वातवरावरून सध्या तरी भरणे यांचे पारडे जड वाटत आहे त्यामुळे यावेळी काय घडते व इंदापूर तालुक्यातील मतदार कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात मातदान रुपी आशीर्वाद देतात व आमदरपदी कोणत्या उमेदवाराची वर्णी लागते या कडे इंदापूर तालुक्याचे आत्तापासूनच लक्ष्य लागले आहे. हे सगळे असेल तरी इंदापूर तालुक्यातील लढत पहिल्यांदाच तिरंगी होत असल्यामुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय चारचानी जोर धरलाय आहे त्यामुळे यावेळीही निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार हे मात्र नक्की..
मतदारसंख्या : ३ लाख ३६ हजार ८००
२०१९
विजयी उमेदवार दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पराभूत उमेदवार : हर्षवर्धन पाटील (भाजप)
मताधिक्य : ३,११०
२०१४
विजयी उमेदवार दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पराभूत उमेदवार : हर्षवर्धन पाटील (काँग्रेस)
मताधिक्य : १४,१७३
२००९
विजयी उमेदवार हर्षवर्धन पाटील (काँग्रेस)
पराभूत उमेदवार : दत्तात्रय भरणे (अपक्ष)
मताधिक्य : ७,९६०

Discussion about this post