जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩जय जिजाऊ 🚩
एकच ध्यास, गडकोट विकास!
तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय !!
आई जगदंबेच्या कृपेने आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राजा शिवछत्रपती परिवार संस्था – मुंबई परिवार यांची मोहीम क्रमांक 100 “शतक महोत्सवी मोहीम सोहळा” किल्ले सांकशी”मुंगोशी-पेण येथे शनिवार दिनांक 19/10/2024
रविवार दिनांक 20/10/ 2024 (श्री शालिवाहन शके १९४६ आश्विन कृ. २, ३ रोजी पार पडत आहे. ज्यासाठी असंख्य मावळ्यांनी अहोरात्र गडसंवर्धनाचे शिवधनुष्य पेलले आहे.या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे भागीदार होण्यासाठी या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
मुंबई परिवाराच्या या विनंतीस मान देवून पेण परिसरातील सर्व शिवभक्त मावळ्यांनी या शतक महोत्सवी मोहिमेचे भागीदार व्हा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडकील्यांना गतवैभव प्राप्त करून देवुया, पुन्हा एकदा मोकळा श्वास देवूया.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण एक नव्हे तर दोन वेळा जयंती तिथी आणि तारखेनुसार मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतो. शिवराज्याभिषेक सोहळा देखील 2 वेळा मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर साजरा होतो.
परंतु महाराजांचा श्वास आणि आत्मा असणारे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण कधी पुढे येणार? या गडकोटांच्या साक्षीने आणि मावळ्यांनी दिलेल्या बलिदानातून हे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. म्हणूनच त्याचे पांग फेडण्यासाठी गड स्वच्छता मोहीमेत सहभागी होणे आपले प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. स्वत:ला शिवभक्त, शिवप्रेमी मानत असाल तर आपण नक्कीच वेळ काढून या मोहिमेला येणार, नाहीतर फक्त महाराजांची वेशभूषा करायची, दाढी केस वाढवायचे गळ्यात रुद्राक्ष, कवड्यांची माळ घालायची भगवे कपडे घालायचे त्याला काय किंमत. खरं तर महाराजांचं अस्तिस्त्व या गडकोटांमध्येच आहे, खरी शिवभक्ती म्हणजे गडसंवर्धन करणे होय.
या इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला जपायच्या आहेत नाहीतर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. नवीन पिढीला गडकिल्ले प्रत्यक्षात पाहता येणार नाहीत, फक्त इतिहासाच्या पुस्तकातच पाहता येतील. शिवरायांनी उभे स्वराज्य रयतेच्या पदरात घातले आपण आपल्या परिसरातील गडकोटांसाठी वेळ देतोय का? त्यांची स्वच्छता करतोय का हे प्रश्न सर्वप्रथम स्वत: ला विचारा, फक्त शिवजयंती दिवसापूरते स्वतःला शिवभक्त म्हणायचे काय? बाकी उरलेले दिवस काय? मी तर म्हणेन अजूनही वेळ गेलेली नाही, महाराजांचे गडकोट आपल्याला जपायचे आहेत. त्यांना मोकळा श्वास द्यायचा आहे.
त्यांची स्वच्छता आणि त्यांचे जतन आपण केले तरच महाराजांना अपेक्षित असलेली शिवभक्ती किंवा स्वतःला मावळा म्हणवून घेण्याचा अधिकार आहे अन्यथा नव्हे!
असे आवाहन शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक, दुर्गरक्षक, दुर्गसेवक, राजा शिवछत्रपती परिवाराचा मावळा, सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलास राजे निर्मला कमलाकर घरत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
गडकोटानी राखिले राज्य, गडकोटानी उभारीले स्वराज्य!
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
1) ज्ञानेश्वर इंगोले- मो. 7738009434
2) दिलीप शिंदे – मो. 8692847562
Discussion about this post