बाबूराव बोरोळे
प्रतिनिधी लातूर
गेल्या अनेक दिवसांपासून येरोळ येथील ३३ के.व्हि. विद्युत केंद्रातुन दिवसाआड विद्युत पुरवठा खंडित होत आहे आणि हा वीज पुरवठा फक्त एक दोन तास नव्हे तर तब्बल चार ते सहा तास खंडित होत आहे. येरोळ येथे मोठी बाजारपेठ असुन सध्या सणासुध्दीचे दिवस आहेत. तर येथे एक राष्ट्रीयकृत बॅक तर एक जिल्हा मध्यवर्ती बॅक असुन महाईसेवा केंद्र असल्यामूळे बहुतांश व्यवहार याच गावातून चालतात. शासकीय कार्यालयांमध्ये जनरेटरची सुविधा असली तरी त्या शासकीय कार्यालयांवरती विविध लोकांचे छोटे मोठे व्यवसाय चालतात.
सतत होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे त्यांच्या व्यवसायांवरती गदा येऊन पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. महावितरणचे कर्मचारी नेहमी येरोळ विद्युतकेंद्राला चाकुरहुन येणारा वीजपुरवठा बंद असल्याचे सांगून विषय टाळून नेतात. परंतु विद्युत कामे करण्यासाठी इतके दिवस लागतात का ? असा प्रश्न आता निर्माण होतो आहे. गुरूवारी सांयकाळी पाच वाजता खंडीत झालेला विद्युत पुरवठा राञीचे दहा वाजले तरी सुरु झालेला नव्हता.
लाईट नसल्यामुळे दररोज मजुरी करणार्या मजुरांना पिठाची गीरणी बंद असल्यामूळे भात खाऊन रहावे लागले तर ऐन संध्याकाळीच खंडीत वीजपुरवठा झाल्याने गोड्यातेलाच्या मंद प्रकाशात जेवन करावे लागले. फॅन बंद असल्यामुळे लहान बालक जेष्ट नागरिकांना चिरटाने ञस्त करुन सोडले. लाईट का नाही हे कर्मचारी व संबधित विभागाचा कनिष्ट अभियंता याचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन आले असुन नागरिक संतप्त झाले आहेत.
Discussion about this post