
श्रीक्षेत्र माहुर/ किनवट- प्रतिनीधी
आदिवासी बंजारा बहुल असलेल्या किनवट माहुर मतदारसंघात गेल्या दोन दशकांपासून माजी आमदार प्रदीप नाईक,व विद्यमान आमदार भीमराव केराम यांच्यातच राजकीय सामना रंगत असुन माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट माहुरच्या जनतेला बरामती करण्याचे गाजर दाखवत सत्ता उपभोगली केंद्र वराज्यात एक हाती सत्ता असतांना बारामती बनविण्याचे आश्वासन हवेतच विरले.
त्यांचेकडुन मतदारसंघातील जनतेच्या पदरी निराशाच आली या उलट विद्यमान आमदार केराम यांनी कोरोनापासुन नागरीकांचा बचाव करण्यासाठी केलेली कामगिरी व अडीच वर्षाच्या काळात केंद्र व राज्य शासनाकडुन सुमारे तिन हजार कोटींचा विकास निधी व त्यातुन झालेला विकास, आदिवासी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पैनगंगा नदीवर मंजूर करून घेतलेले उच्च पातळी बंधाऱ्यासह केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे या मतदारसंघातील मतदार समाधानी असल्याचे चित्र पहावयास मिळत असून या मतदारसंघात आमदार केराम यांचा वरचष्मा असल्याचा विश्वास भाजपा नेते तथा विधानसभा अध्यक्ष बाबुराव केंद्रे यांनी आमच्या प्रतिनीधीजवळ व्यक्त केला.
Discussion about this post