‘सोशल मीडियाचा वापर वाढला,इनफ्लूएन्सर्स बनले आधुनिक प्रचार दूत.’त-हाडी:- सद्या विधानसभा निवडणूकांच्या प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरु झाली आहे.जाहीरसभांना अद्याप सुरुवात झाली नसली तरी जाहिरातीच्या माध्यमातून आणि सोशल माध्यमांवरील विविध पोस्ट,रिल्स यावरून प्रचाराला सुरुवात झाली आहे.त्यात व्हाईस ओव्हर, ग्राफिक्स, व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागितला जात आहे.
थेट मतदारांपर्यंत पोहचण्याचा पर्याय म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा वापर करायला सुरुवात केली आहे.एकूणच प्रचाराला सद्या इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने निवडणुकांचा फिवर तापायला सुरुवात झाली आहे.
निवडणूकांच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या तंत्राचा वापर करीत असतात.त्यामध्ये सभा,पदयात्रा, बॅनर आदींचा वापर केल्या जातो.पूर्वी गावात “ताई,बाई,आका…मारा शिक्का ची धूम ठोकणारी जीप फिरायला लागली म्हणजे निवडणुकाना सुरुवात झाल्याचे चित्र रंगविले जायचे,मात्र आता डिजिटल युगात उमेदवाराची प्रचाराची धुरा इव्हेंट कंपन्यानी घेतली आहे.त्यामुळे रस्त्यावरच्या हॅन्डलर्सचा चांगलाच वट वाढला आहे.उमेदवारांसाठी गाणी लिहिणे-गाणे,भाषणे लिहिणे,
प्रचाराचा रथ काढणे,मतदारसंघात सर्वेक्षण करणे अशी सर्वच कामे इव्हेंट कंपनी करून घेते.त्यामुळे कार्यकर्त्यांकडील ताण कमी झाला आहे.हे सोशल हॅन्डलर्स नेत्यांचे व्हिडिओ,फोटो, मेसेज लगेच व्हायरल करतात.इतकेच नव्हे तर ते ब्रॅण्डिंग करण्याचे काम करीत आहेत.सद्या गाठीभेटी,चौकात सभा घेणे यांचे महत्व कमी झालेले नाही,पण फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्राम, ट्वीटर सारख्या माध्यमातून उमेदवारांचे सोशल हॅन्डलर्स पोस्ट टाकत असल्याने ते जणू प्रचारदूतच बनले आहेत.
चौकट ;”प्रचाराचा नवा फंडा.”सोशल मीडियावर मिम्स हा प्रकार निवडणुकीत मनोरंजन आणि प्रचारासाठी प्रभावी ठरत आहे.विरोधातील उमेदवारांचे जुन्या काळातील आश्वासनाचे जुने व्हिडिओ, कात्रणे यांचा वापर करून मिम्स बनवत ते व्हायरल करून मतदारांपर्यंत पोहचले जात आहेत,
त्यामुळे सोशल मीडियावर दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये वॉर सुरु होत आहे. काही इच्छुक उमेदवारांकडून यूट्यूबर्सवरील इंफ्लूएन्सर्सची मदत घेतली जात आहे.फॉलोव्हरपर्यंत पोहचण्यासाठी युट्युबर्सकडून इंटरव्यू घेतले जात आहेत.त्यामुळे अनेकांपर्यंत पोहचण्यास मदत होत आहे.
चौकट ;”रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध.”इव्हेंट कंपन्यांना नेत्याचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया हॅन्डलर्सची गरज भासते.परंतु सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य असलेल्या लोकांची कमतरता आहे.
त्यामुळे कंपन्यांकडून विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उमेदवारांच्या सोशल मीडिया टीमचा भाग बनून पैसे कमविण्याची संधी मिळाली आहे.
Discussion about this post