बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाच्या चोर खिशातून ४९ हजाराची रोकड उडविली. ही घटना बुधवारी दुपारी १२.५० वाजण्याच्या दरम्यान बसस्थानकात घडली. यामुळे प्रवाशांची खळबळ उडाली.
महेंद्र नथुजी पाचकते (६१) स्नेहल नगर, खामगाव जिल्हा बुलढाणा, असे फिर्यादीचे नाव आहे. ते सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांचा भाऊ सावंगी मेघे येथे रुग्णालयात भरती आहे .
त्यांच्या उपचारासाठी ४९ रुपयांची रोकड घेऊन जात होते. खामगाव येथून आल्यावर यवतमाळ बस स्थानकात उतरले,
सावंगी मेघे येथे जाण्यासाठी यवतमाळ ते नागपूर बस ( एम् एच १४, बी टी ,५०१७) मध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोर खिशात ठेवलेली रोख उडविली.
बसच्या दोन पायऱ्या चढल्यावर चोरीची ही घटना लक्षात आली.. चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
Discussion about this post