लामजना पाटी जवळील टोल नाक्याच्या कठड्याला गाडी धडकून एकाचा जागीच मृत्यूबाबूराव बोरोळे जिल्हा प्रतिनिधी लातूर निलंगा येथील व्यापारी महेश शिवाजीआप्पा रेशमे यांचे आज रात्री लामजना पाटी जवळील टोल नाक्याच्या कठड्याला गाडी धडकून जागीच मृत्यू झाला मृत्यू समयी ते 49 वर्षाचे होते. निलंगा येथील हे व्यापारी मुलांच्या शिक्षणासाठी लातूर येथे घर केले होते.
त्यांना भेटून ते रात्री निलंग्याकडे निघाले असता साडेअकराच्या सुमारास त्यांची गाडी लामजना पाटी जवळील टोल नाकाच्या जवळ आली असता टोल नाक्याच्या कठड्याला धडकून त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
त्यांचा मृतदेह किल्लारी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी अपघात दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याचेही सांगितले.
त्यानंतर महेश रेशमे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला.त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
येथील शिवसेनेचे नेते लिंबन महाराज रेशमे यांचे ते पुतणे तर व्यापारी महासंघ असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवाजीअप्पा रेशमे यांचे ते मुलगा होत.
Discussion about this post