

किनवट – माहूर विधान सभा मतदार संघ निवडणूकीचे उमेदवारी अर्ज भाजपाकडून आमदार भिमराव केराम यांनी मतदारांची मोठी शक्ती प्रदर्शन रॅली काढून उमेदवारी अर्ज २८ ऑक्टोंबर रोजी दाखल केला .तर सचिन नाईक यांनी ही मोठे शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शहरात यात्रेचे स्वरूप दिसू लागले भिमराव केराम यांनी गेल्या २० ते २२ महिण्यात संपूर्ण मतदार संघात शेकडो कोंटीचा विकास
नीधी आनुन कामे केली त्यांनी
केलीली कामे दिसत असल्याने
आम्ही त्यांनी केलेल्या विकास कामाल मत देणार अशी चर्चा शक्ती प्रदर्शनातील मतदारां मध्ये सुरू होती त्यांच्या शक्ती प्रदर्शनास मतदार फार मोठया संख्येने उपस्थित होती केराम साहेब सुद्धा या वेळेसची निवडणूक मी केलेल्या विकास कामाचा जोरावर निवडणूक लढत आहे असे बोलत होते.
मागिल विधानसभा निवडणुकीपासून निवडणूक लढवू इच्छिनारे नव तरुण सचिन नाईक यांनी ही निवडणूक लढण्याची एक वषार्पासून तयारी सुरु केली आहे मतदार संघातील प्रत्येक गावांना भेटी देवून मंतदारांच्या संपर्कात असल्यानेच उमेदवारी अर्ज दाखल करतांना केलेल्या शक्ती प्रदर्शनात मोठ्या संख्येनं त्यांचे चहाते उपस्थित होते. फार मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज २८ ऑक्टोंबर रोजी त्यांनी दाखल केला.
Discussion about this post