आगामी जिल्हा
परिषद निवडणुकीत ब्राम्हणगाव गटात उच्चशिक्षित नवीन युवा चेहरा पुढे यावा अशी प्रबळ लोकभावना असताना नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक चे कार्यध्यक्ष,उपमुख्यमंत्री मा.श्री.अजित दादा पवार यांचे विश्वासु मानले जानारे कु.प्रसाद दळवी यांचे नाव अग्रक्रमाने पुढे आले आहे नुसते प्रौढ नाही तर तरूण आणि विद्यार्थी यांच्या ओठांवर देखील प्रसाद दळवी यांचे नाव येत आहे
महिला सक्षमीकरण मेळावा,युवक विद्यार्थी मेळावा,शासणाच्या विविध योजना जनते पर्यंत पोहचा व्यात त्या साठी विविध शिबिर,शैक्षणिक उपक्रमाबरोबर सामाजिक उपक्रमात आघाडी घेत त्याच्या रूपाने ब्राम्हणगाव गटाला वक्तृत्व आणि कर्तृत्वाची जोड असलेले एक धाडसी युवा नेतृत्व मिळेल अशी भावना व्यक्त होत आहे. .
प्रसाद दळवी यांचे ब्राम्हण गाव गटात व तालुक्यात तसेच जिल्ह्यात सर्व पक्षी नेते मंडळींशी चांगले संबंध आहे.एक राजकीय कुटुंबात जन्माला आलेली ही व्यक्ती त्यांचे पंजोबा,गिरणा सहकारी साखर कारखान्याचे चे मा.चेअरमन,लोकनेते,स्व सखाराम आबा दळवी,आजोबा,मराठा विद्या प्रसारक समाज सस्थेचे चिटणीस श्री.दिलीप(भावसा)दळवी,लखमापुर चे मा.सरपंच श्री.केवळ(दाजी)दळवी,मा.सपरंच श्री.सागर दळवी,आई,सौ.सुवर्णा दळवी चेअरमन लखमापुर विविध कार्यकारी सोसायटी,यांच्या राजकीय व सामाजिक वारसा जोपासण्याचे कार्य हे प्रसाद दळवी उतिशय उत्तम प्रकारे करतात,दळवी कुटुंबाचे अनेक वर्षांन पासुन ब्राम्हणगाव जि.प.गटात नातेसंबंध देखील आदीक आहे
मागील निवडणुकीत मा.जि.प.सदस्य,प्रशांत बच्छाव यांच्या विजया मध्य दळवी परिवाराचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले तरी वावगे ठरनार नाही,प्रसाद दळवी यांना उमेदवारी मिळाल्यास त्याच्या विजयासाठी आजी,माजी जि.प.सदस्य,विविध सर्व पक्षीय नेते मंडळी व मित्र परिवार व सर्वसामान्य जनताच निवडणुक हातात घेईल, आणी ब्राम्हणगाव-लखमापुर जि.प.गटात एक युवा नेतृत्वा च्या रुपाने गटात विविध विकास होईल अशी जनभावणा सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे.
Discussion about this post