
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघात अखेरच्या क्षणापर्यंत एकूण ५१ लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. छाननीच्या दिवशी अनेकांचे अर्ज वेगवेगळ्या त्रुटीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविले आहे. दरम्यान मोठा वाजागाजा करून नामांकन दाखल करणारे प्रहार पक्षाचे उमेदवार डॉ. महेश चव्हाण यांचा अर्ज बाद झाल्यामुळे कोणत्या उमेदवार यांची बाजू भक्कम होईल असे राजकीय चित्र दिसत आहे.
कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचे भाचे डॉ. महेश चव्हाण यांनी पक्षनेते बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून नामांकन अर्ज दाखल केलेला होता. परंतु छानणीच्या दिवशी अर्जात त्रुटी निघाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद ठरविला. आणेक पक्षाचे इच्छुक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली असून त्यांचा अर्ज कायम आहे. दरम्यान बंजारा समाजाला राजकीय पक्षाकडून उमेदवारी नसल्यामुळे प्रहार पक्ष बंजारा समाजाच्या आपक्ष उमेदवाराला पाठींबा देतो का? हा सध्या चर्चेचा विषय आहे डॉ. महेश चव्हाण यांचा अर्ज बाद झाल्याने प्रहार पक्ष कोणाची बाजू भक्कम करते किंवा पाठींबा देते समोर समजेलच.
Discussion about this post