सध्या अहील्यानगर मध्ये कीटकनाशके जील्हाबंदी कायद्याचे उलघन मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यात कृषी विभाग प्रामुख्याने दुर्लक्ष्य करताना दिसत आहे. आणि याचाच फायदा घेत काही महाभाग बनावट औषधे विकताना दिसत आहे . काही नामांकित औषधे अधिकृत कंपनीच्या डिस्त्रीब्यूटर ला मोठी लागत लावून मोठ्या प्रमाणात माल घेऊन मिळत नाही अश्या भावात ट्रेडर्स विकताना दिसत आहे . काही कीटकनाशके , तणनाशके व बुरशीनाशके कंपनी कडून न घेता बाहेरून विकताना दिसत आहे . यामध्ये संगमनेर ,कोपरगाव व अहिल्यानगर चा मोठ्या प्रमाणत सहभाग आहे . आणि निदर्शनास काही गोष्टी अश्या देखील आल्या आहेत अधिकारी तुपाशी आणि शेतकरी मात्र उपाशी . या मध्ये प्रामुख्याने BASF, Syingenta , Corteva ,Indofil अश्या अनेक कंपन्यांच्या शेतीविषयक औषधांचा समावेश आहे .या बाबत जिल्हा व तालुका प्रशासनाने दखल घेणे आणि कार्यवाही करणे गरजेचे आहे . येणाऱ्या रब्बी हंगामात शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे आहे . यात प्रामुख्याने मोठ्या दुकानदारांचे नमुने बिल चेक करणे गरजेचे आहे नाहीतर गरिबाला फाशी आणि मोठ्याला सोन्याचा चमचा अशी गोष्ट होऊन बसेल . यावर प्रशासन कधी कार्यवाही करणार असा सवाल संकल्प प्रतिष्ठान चे सचिव अनुप म्हाळस यांनी व्यक्त केला आहे .
Discussion about this post