गणेश राठोड
उमरखेड प्रतिनिधी,*
पिंपळवाडी तांडा येथे मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी एक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. टाकळी गज ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या विसापूर-पिंपळवाडी या भागात मंडळ अधिकारी यस. जी. आढाव, अमडापूर येथीलतलाठी सौ पल्लवी तरलवार निंगवर येथील तलाटी वि. पी. भालेराव, महसूल सेवक वि. वि. भोंगाळे आणि वाय. अ. मारकवार यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महिलांच्या सक्रिय सहभागामुळे या जनजागृती उपक्रमाला विशेष यश लाभले. पिंपळवाडी तांडा येथील सर्व महिला भगिनी एकत्र आल्या आणि मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले. रॅली पिंपळवाडी तांडा येथून इसापूर मतदान केंद्रापर्यंत काढण्यात आली.
यामध्ये महिलांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते आणि बंजारा गीते गात वातावरण अधिक रंगतदार केले. या रॅलीचा उद्देश सर्वसामान्य जनतेपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचविणे हा होता. महिलांचा उत्साह, एकजूट आणि योगदान यामुळे या उपक्रमाने ग्रामस्थांना प्रेरणा दिली.
हा उपक्रम लोकशाहीसाठी प्रेरणादायी ठरला असून, भविष्यात अशा प्रकारच्या उपक्रमांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे.या रॅलीसाठी संतोष नाईक किसन जाधव कारभारी थ्रीडी न्यूज चे पत्रकार संजय जाधव उमेद महिला बचत गटाची आयसीआरपी वैशाली चव्हाण पशु सखी संगीता जाधवपिंपळवाडी ईसापुर येथील सर्व महिलायांनी योग्य नियोजन केले होते.
Discussion about this post