विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे यांच्याशी सखोल चर्चा,
आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर मतदार संघाच्या बाबतीत मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाच्या वतीने आंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन देवून सखोल सकारात्मक चर्चा
केली.याबाबत मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
यावेळी मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर मतदार संघाचे विद्यमान आमदार हे मराठा समाजासोबत कायमच आहे .तसेच मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांना स्थानिक आमदाराच्या विरोधात दुसऱ्या मराठा व्यक्तीला उमेदवारी देवून मतांचे ध्रुवीकरण करू नये अशी विनंती केली. तसेच काही लोक मनोज दादांचे नाव वापरून दादांनी उमेदवारी जाहीर केल्याचे तसेच दादांच्या संपर्कात असल्याच्या बतवण्या करीत असल्याने मुक्ताईनगर मतदार संघामध्ये उलट सुलट व संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चा सुरू असल्याचे देखील सांगितले.यावेळी मनोज दादांनी सांगितले मी अजून
पर्यंत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत निर्णय किंवा उमेदवारी देण्याबाबत चर्चा झालेली नाही असे स्पष्टपणे सांगितले. व माझ्याकडे सर्व प्रकारचे लोक येतात त्यामुळे कोणी फोटो काढून अपप्रचार करीत असेल हे चुकीचे असे सांगत स्थानिक मराठा समाजाचं मन दुखेल अशा प्रकारचे कोणतेही काम मी करणार नाही असा शब्द मनोजदादांनी मुक्ताईनगर येथून भेट घेण्यासाठी गेलेल्या मराठा समाजाच्या शिष्ट मंडळाला दिलेला आहे.
याप्रसंगी मराठा तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख, साहेबराव पाटील, ललित बाविस्कर, दिनेश कदम , बोदवड तालुक्यातील मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील , बोदवड मराठा समाज तालुका अध्यक्ष डॉ उद्धव पाटील, मराठा सेवा संघ बोदवड तालुका अध्यक्ष विलास सटाले सर, छावा संघटनेचे अमोल व्यवहारे, प्रमोद धामोडे,श्रीराम शेळके सर, दिग्विजय पाटील आदीसह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.
Discussion about this post