
आजरा – तालुका प्रतिनिधी,
आजरा नगरपंचायत हद्दीतील समर्थ कॉलनी येथील नागरीकांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कॉलनी मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रस्ते खुदाईमुळे धुळ आणिखड्डे पडून रस्ते नादुरुस्त झाले आहेत.
अशा प्रकारच्या सुचना व तक्रारी करून देखील त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. या समस्यांची सोडवणूक तत्काळ करावी अशी मागणी समर्थ कॉलनीतील नागरीकांची आहे.
याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी श्री. राकेश चौगले यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले कि, समर्थ कॉलनीमध्ये गेले काही महिने कमी दाबामुळे पाणीपुरवठा होत आहे. पाणी सोडण्याच्या वेळा अनियमित, चार दिवसांनी वेळापत्रक बदल अशा वेळापत्रकामध्ये योग्य बदल करावेत पाणीपुरवठा व्यवस्थित चालू करावा. येथील रस्ते दुरावस्था, खडडे, यामुळे पक्का रस्ता व्हावा. गटारी नादुरुस्त झाल्यामुळे पाणी निचरा नसलेमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डास आणि रोगराई पसरली आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गटारी स्वच्छता करण्याची गरज आहे.
नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी श्री. चौगले यांच्यासोबत नागरीकांची सकारात्मक चर्चा करून पुढील कार्यवाही करतो अशी ग्वाही दिली.
निवेदनावर शिवाजी बिद्रे सर, अशोक पाटील, बी. एम. मोहिते, डॉ. आर.जी. गुरव, रोहन साठे, विजय अमणगी सर, बाळकृष्ण दरीसर, जोतिबा आपगेकर, सचिन पवार यांच्या सह्यांचे निवेदन देणेत आले.
Discussion about this post