आजरा – तालुका प्रतिनिधी,
सध्याच्या मोबाईल युगामध्ये वेळात वेळ काढून रवळनाथ कॉलनी येथील बाल विकास तरुण मंडळाच्या बाल युवकांनी सुंदर असा प्रतापगड किल्ला बनविला आहे.
प्रथम शिवरायांचा प्रतिमेचे श्री. अनिल पाटील, परशुराम बामणे, गौरव देशपांडे यांच्या शुभ हस्ते पूजन केले अध्यक्ष, अनिल पाटील यांनी फित कापून उदघाटन केले.
प्रतापगड किल्ला उद्धाटन अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष, मा. परशुराम बामणे रवळनाथ कॉलनी अध्यक्ष, अनिल पाटील, सुभाष कांबळे, गौरव देशपांडे यांच्याहस्ते उद्धाटन झाले.
युवकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रतापगडाची माहिती कुणाल विभूते तसेच सुनिल देसाई यांनी दिली यामध्ये बाल युवक व महिला उपस्थित होत्या.
Discussion about this post