‘महावितरण’ म्हणले कि सर्वसामान्य नागरिकांपासून उद्योजकां पर्यंत थोडेफार नाराजीचे सूर पाहायला आणि ऐकायला मिळतात. कारण सणासुदीला नेहमी विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावेच लागते. त्यात दिवाळीसारख्या सणाला तर विद्युत पुरवठा खंडित होतोच होतो. मात्र यंदाची दिवाळी महावितरण आणि नागरिकांसाठी खास होती. मिरजेतील महावितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री कसबे यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह मिरज शहर आणि विस्तारित भागाचे विद्युत पुरवठ्याबाबत योग्य नियोजन केल्याने यंदा दिवाळीमध्ये दिवाळी पहाट हि प्रत्येक घरी उजळून निघाली आणि दिवाळीच्या पाचही दिवसांमध्ये विद्युत रोषणाईचा आनंदही नागरिकांना घेता आला कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता कसबे यांनी आपल्या प्रत्येक विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना अखंडित विद्युत पुरवठ्याबाबत योग्य सूचना दिवाळी पूर्वी दिल्याने नागरिकांच्या तक्रारीपूर्वी काही भागातील विद्युत पुरवठ्याच्या कामातील अडथळे दूर झाले त्यामुळे यंदा दिवाळीमध्ये महावितरण ने नागरिकांची दिवाळी अधिक सुखकर केली असे म्हणता येईल. त्यातच महिना अखेरीस दिवाळी आल्याने महावितरण ची वसुली मोहीमही तीव्र करण्यात आली होती मात्र नागरिकांनी आपली विद्युत देयके वेळेवर भरल्याने कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चांगला संवादही साधला गेला. अजूनही ज्यांनी विद्युत देयके भरली नसतील त्यांनी ती वेळेवर भरावीत असे आवाहनही कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर आणि श्री कसबे यांनी केले आहे.
Discussion about this post