शिरोळ तालुका प्रतिनिधि/ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात पश्चिम महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेने राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश वायदंडे आणि राज्य उपाध्यक्ष जयप्रकाश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना शिरोळ मतदारसंघातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असते. संघटनेने गणेशवाडी, शेडशाळ, शिरोळ, कुटवाड, मौजेआगर, उदगांव, संभाजीपूर, नांदणी, जांभळी, यड्राव, टाकवडे, दानोळी, कोंडीग्रे, जयसिंगपूर, हरोली, चिपरी, जैनापूर, बुबनाळ, औरवाड या गावांतील किमान ३ हजार बांधकाम कामगारांसाठी सेवा पुरवल्या आहेत.
कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या न्यायिक मागण्यांचा पाठपुरावा, आणि सामाजिक कल्याणासाठी संघटना कार्यरत आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय आणि उपक्रमांचा समर्थनार्थ संघटनेने त्यांच्या कार्याला पाठींबा दिला आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष सतीश वायदंडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
Discussion about this post