गेल्या 50 वर्षांमधील गणपतराव पाटील दादांची एक प्रयोगशील आणि अनुभव संपन्न शेतकरी म्हणून झालेली वाटचाल सर्व शेतकऱ्यांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक अशी ठरलेली आहे. शेती आणि शेतकऱ्यांसमोरील कोणत्याही अडचणींवर त्यांच्याकडे हमखास उपाय असतोच. शेती कशी करायची? शेती फायदेशीर कशी करायची? बाजारपेठेचा अंदाज कसा घ्यायचा?
कोणत्या वेळी कोणत्या पिकाचे, भाजीपाल्याचे उत्पन्न घ्यायचे? त्यासाठी कोणती काळजी घ्यायची? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करायची? अशा एक नाही अनेक प्रश्नांची उत्तरे दादांच्याकडे असतातच. शेतकऱ्यांना आपला वाटणारा, आपल्या ‘हक्काचा शेतकरी’, ‘मार्गदर्शक माणूस’ अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. दादांच्या सारखा एक शेती प्रश्नांची ‘जाण’ असणारा ‘अभ्यासू माणूस’ विधानसभेत गेला तर, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारा एक हक्काचा माणूस आपल्याला मिळू शकतो.
आजही दादांच्या भोवतालचा गोतावळा पाहिला की, तो शेतकऱ्यांचाच असतो. श्री दत्त कारखान्यामधील केबीन असो वा शेताचा बांध, कुणाच्या घरी एखादा कार्यक्रम असो वा कुठे शेती संदर्भात चर्चा, दादा तेथे आवर्जून गप्पांमध्ये रमतात, आपल्या जवळ असणाऱ्या ज्ञानाची ‘शिदोरी’ ते सर्वांना देतात. मातीविना शेती, द्राक्षे, टोमॅटो, गुलाब, जरबेरा फुल शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती मध्ये केलेला वापर, शेतकऱ्यांचा बनविलेला प्रयोग परिवार, आत्ताच्या परिस्थितीत शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, मार्केट, मार्केटिंग, सामूहिक शेतीचे प्रयोग, हक्काचे उत्पन्न देणारी बी बियाणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, देशी वाण बियाणांचे फायदे आणि त्यांचे आगामी काळातील महत्त्व अशा अनेक गोष्टींवर दादा भरभरून बोलतात. त्यांचे मार्गदर्शक बोलणे भारावून टाकणारे असते. त्यांचे ऐकून, त्यांचे मार्गदर्शन घेवून आज अनेक तरुण शेतीकडे वळून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. त्या तरुण शेतकऱ्यांच्या ‘यशोगाथा’ गावोगावी लोकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत.
शिरोळ तालुका आणि परिसर हा नेहमीच महापुराचा सर्वाधिक फटका बसणारा परिसर म्हणून ओळखला जातो आहे. पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षी प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेले पीक महापुरात उद्धवस्त होताना, कुजून जाताना होणाऱ्या वेदना कोणीच पाहत नाही. आश्वासना खेरीज त्याला काहीच मिळत नाही. मिळणारी नुकसान भरपाई म्हणजे ‘तोंडाला पाने पुसण्याचा’ प्रकार असतो. हे नुकसान टाळण्यासाठी दादांनी शेती शास्त्रज्ञ, शेतीतज्ज्ञांच्या सल्ल्याने आंबा, पेरू, चिकू, लिची, शुगर बिट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करण्याचा प्रयत्न केला. त्याला यशही येत आहे.
शेतकऱ्यांना एकत्रित करून शेती संस्था स्थापन करून जमीन क्षारपड मुक्तीचा प्रयोग दादांनी यशस्वी करून दाखविला आहे. याची दखल देशात आणि परदेशात घेतली जात आहे, हे आपणासाठी कौतुकास्पद आहे. आता तर दादांच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संस्था स्थापन करण्यात येत असून त्या माध्यमातून भाजीपाल्याचे मार्केटिंग आणि बाजारपेठ मिळवून देण्याचा विचार पूर्णत्वास येतो आहे. पुरबुडीत क्षेत्रात भाजीपाला पिकविण्याचा प्रयोग यशस्वी होऊन ऊस पिकाइतके उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीची आज खरी गरज आहे. शेतकऱ्यांना आपला वाटणारा, आपल्या ‘हक्काच्या शेतकरी माणसाची’ आपल्याला गरज आहे. दादांच्या रूपाने हा आधारवड आपल्याजवळ आहे. दादांना आपण साथ सोबत केली, त्यांना आमदार केले तर एक शेतकरी हिताला केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या नेत्याला नवी ऊर्जा, संधी दिल्यासारखे होईल.
Discussion about this post