
पालघर :सौरभ कामडी..
मोखाडा जन सेवा फाउंडेशन भारत यांच्या मार्फत दिवाळी निमित्त जांभूळवाडी,जव्हार येथे गरीब गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी जनसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन पाटील,संपर्क प्रमुख राजेश भालींगे व पदाधिकारी उपस्थित होते.
दिवाळी ही समाजाच्या प्रत्येक घटकात खेड्या पाड्यातील लोकांन सोबत साजरी करावी या हेतूने जनसेवा फाउंडेशन यांनी एक पाऊल उचलून सर्व सामान्य जनतेच्या सेवे साठी व त्यांना एक छोटीसी मदत म्हणून गाव पाड्यात जाऊन समाज बांधवांना दिवाळी निमित्त कपड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लहान मुलांचे कपडे ते मोठ्या माणसाचे स्त्री पुरुषाचे कपडे वाटप करण्यात आले. यावेळी जमलेल्या लोकांन मध्ये त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होतो.
यावेळी जमलेल्या लोकांनी जनसेवा फाउंडेशन चे आभार मानले व अशीच मदत आपल्या हातून व्हावी व आपल्या संस्थेचे नाव खूप मोठे व्हावे अश्या शुभेच्छा दिल्या.यावेळी जनसेवा फाउंडेशन भारत च्या पदाधिकाऱ्यांनी ही उपस्थित जनतेचे आभार मानले व ही एक छोटीसी भेट असल्याने यापुढे ही आपणास मोठ्या प्रमाणात भेट देऊन आपली दिवाळी साजरी करू असे जनसेवा फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Discussion about this post