
शिरूर : समाजातील चालु घडामोडी च्या गोष्टी समाजापुढे आणणे व अन्याय विरुद्ध आवाज उठावणे च काम करीत असताना जर पत्रकार च सुरक्षित नसेल तर, पुन्हा एकदा सरकार वर प्रश्न निर्माण होत आहे,शिरूर तालुक्यातील युवा पत्रकार वर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे, कु.सचिन दगडे हे काल शिक्रापूर – हिवरे मार्गी जात असतानी त्यांच्या समोर नंबर प्लेट नसलेली काळी चारचाकी गाडी अचानक समोर येउन थांबली .त्यातून काही अज्ञान व्यक्तींनी बाहेर पडताच त्यांना दमदाटी करीत शिवीगाळ केली,
तर त्यातील एकजणाने लोखंडी रोड ने मारायला काढला असता,तिथून रोडने येणारे जाणारे तेथील काही लोक येताच, अज्ञान व्यक्तींनी कार गाडी मधुन पलायन केले, त्यामध्ये पत्रकार सचिन दगडे है सुदैवाने वाचले असता,ऐन निवडणुकच्या काळात पत्रकारवर प्राणघातक हल्ला होणे,पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे,स्थानिक लोकांमध्ये वेगवेगळी चर्चा होऊ लागली आहे,
कु.सचिन दगडे हे पत्रकार च काम करीत असुन,पुणे ग्रामीण पोलीस मित्राच सुद्धा काम बगत आहे,त्यांच्यावर नेमका कोणत्या गोष्टीतून झाला आहे ह्याचा तपास चालु आहे..
Discussion about this post