
या मेळाव्याला कडेगाव तालुक्यातून मोठ्याप्रमाणात माता-भगिनी उपस्थित होत्या.
या वेळी आमदार सौ.चित्राताई यांनी मोठ्या प्रमाणावर महिलांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि महिला भगिनींसाठी सरकारची भूमिका याविषयी जागृती केली. या मेळाव्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद ही पलूस-कडेगांव मध्ये होणाऱ्या परिवर्तनाची नांदी ठरेल यात शंका नाही.
यावेळी भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. राजाराम भाऊ गरुड, सांगली महापालिकेच्या माजी नगरसेवक स्वातीताई शिंदे, माजी सभापती कडेगांव पंचायत समिती मंदाताई कारंडे, माजी सभापती कडेगाव पंचायत समिती मंगलताई क्षिरसागर, भाजपा महिला तालुका उपाध्यक्ष प्रतीक्षा वाघमोडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप कदम, पलूस तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष सारंग माने, सौ. अपर्णा ताई संग्राम देशमुख यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..
.
.
.
Discussion about this post