
लोहा,
लोहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्थळात भारत निवडणूक आयोगाच्या सुसूत्रीकरण आदेशान्वये जुन्या मतदान केंद्राच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे तसेच मुबलक जागा नसल्याच्या कारणात्सव नजीकच्या आणि सुस्थीतीत असलेल्या शासकीय आस्थापनाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत. मतदारांना नूतन मतदान केंद्र ठिकाणी स्थलांतरीत मतदान केंद्राची माहिती व्हावी तसेच संबंधित केंद्रावरील मतदारांनी आपले मतदान ज्या मतदान केंद्रावर आहे अशा ठिकाणी जावून दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत सर्व मतदारांना शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी केले आहे. नवीन आणि स्थलांतरित मतदार केंद्र पुढील प्रमाणे असे – लोहा
विधानसभा मतदारसंघातील स्थलांतरित मतदान केंद्र क्र. २१२ जि. प. कें. प्रा. शाळा पश्चिम बाजू कंधार, मतदान केंद्र क्र. २१६ श्री. गणपतराव मोरे विद्यालय कंधार (पश्चिम उत्तर बाजू), मतदान केंद्र क्र. २१३ जि. प. कें. प्रा. शाळा मध्य बाजू कंधार, मतदान केंद्र क्र. २१७ श्री गणपतराव मोरे विद्यालय कंधार (पश्चिम दक्षिण बाजू), मतदान केंद्र क्र. २१५ जि. प. हायस्कूल (मुलांचे) उत्तर बाजू कंधार, मतदान केंद्र क्र. २१९ श्री गणपतराव मोरे विद्यालय कंधार (पूर्व बाजू), मतदान केंद्र क्र. २२१ नंदकिशोर दत्तात्रय बिडवई कनिष्ठ महाविद्यालय कंधार (पूर्व बाजू), मतदान केंद्र क्र. २२५ मनोविकास प्राथमिक शाळा कंधार (मध्य बाजू), मतदान केंद्र क्र. २२९ जि. प. हा. मुलीचे (मध्य बाजू) कंधार, नविन मतदान केंद्र क्र. २३३ श्री शिवाजी विधी महाविद्यालय (पश्चिम बाजू) कंधार, मतदान केंद्र क्र. २३० जि. प. हा. (मुलींचे) दक्षिण बाजू कंधार, मतदान केंद्र क्र. २३४ श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार (पूर्व बाजू) आदी नूतन केंद्र तयार करण्यात आले आहेत याची संबंधित केंद्रातील मतदारांनी नोंद घ्यावी असेही निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे..
Discussion about this post