दारू विका पण सरकारी भावात.
बिबी गावातील युवकांचे सरपंचाकडे मागणे
लोणार तालुक्यातील बीबी मध्ये सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे बिबी गावाशी जवळपास पंधरा गावांचा संपर्क आहे रोज शेकडो लोक देशी दारू पितात पण या दुकानात छापील किमतीपेक्षा म्हणजेच सरकारी दरापेक्षा ज्यादा दराने दारू विक्री होती असा आरोप बीबी येथील गणेश तनपुरे यांनी केला आहे
तसे लेखी निवेदन बीबी सरपंचाकडे दिलेले आहे देशी दारू दुकानात कुठल्याही प्रकारचे दर फलक नाही म्हणजे किती रुपयाला कॉटर मिळते ते पण नाही विचारपूस केली तर दुकानावरील कामाला असलेले लोक लोक दमदाटी करतात आणि पोलिसांना बोलवून आम्हाला घेऊन जातात आमचा हा प्रश्न गावातील प्रथम नागरिक म्हणून सोडावे असे लेखी निवेदन दिल्याचे गणेश तनपुरे यांनी सांगितले दारू विका पण सरकारी दरात
दुकानात भाव फलक लावा ग्राहकाला आदराने बोला चढ्या दराने दारू विक्री केल्यास कोणत्या नंबर वर संपर्क साधायचा तो पण लिहा
असे निवेदन बीबी ग्रामपंचायतला दिले आहे याप्रकरणी ग्रामपंचायत कारवाई करणार की उत्पादन शुल्क विभागाला निवेदन करणार याकडे परिसरातील दारू येणाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागलेले आहे
प्रतिनिधी समाधान राठोड
7447573201
Discussion about this post