वैजापूर तालुक्यातील गोळवाडी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवकांचा मनमानी कारभार,
ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी कामाचा हिशोब मागितल्याने ग्रामसेवकांनी सूडबुद्धीने ग्रामपंचायत सदस्य सुनील मांजरी यांना अतिक्रमणाची नोटीस पाठवण्यात आली कारण की तुम्ही मला हिशोब का विचारला तशी लेखी अर्ज ही सुनील मांजरी यांनी ग्रामसेवकाला दिला तर ग्रामसेवकांनी सुनील मांजरी यांना कामाचा हिशोब न देताच अतिक्रमणाची नोटीस दिली. गावात अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी अतिक्रमण केलेले आहे तरीपण ग्रामपंचायत सदस्याला नोटीस दिली असे ग्रामसेवक सुनील जाधव यांनी सूडबुद्धीने मनात राग धरून ग्रामपंचायत सदस्याला नोटीस पाठवली. ग्रामपंचायत सदस्य सुनील मांजरी यांनी लेखी तक्रार२९ ऑगस्ट रोजी लेखी स्वरुपात तक्रार दिली. व माहिती विचारली म्हणून, ग्रामसेवकांनी तक्रारीचे उत्तर न देताच सूडबुद्धीने ७ सप्टेंबर रोजी अतिक्रमणाची नोटीस पाठवली, सुनील मांजरे त्या जागेवरती२० वर्षापासून आरसीसी इमारत बांधून निवास करत आहे.२० वर्षात एकदाही अतिक्रमणाची नोटीस दिली नाही, पण मी ग्रामसेवकाला गावातील कामाचा हिशोब मागितला म्हणून त्यांनी मला अतिक्रमणाची नोटीस पाठवली कारण की गावात ही अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले असताना त्यांनी मला केवळ आणि केवळ मनात द्वेष व सुडबुद्धीनेच मला नोटीस पाठवली आहे. नोटीस दिलेल्या तारखेला मी ग्रामपंचायत मध्ये हजर झालो परंतु ग्रामसेवकच त्यादिवशी ग्रामपंचायत मध्ये हजार नव्हते. ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यालाच जर कामाचा हिशोब सांगत नाही तर सर्वसामान्य जनतेला काय हिशोब देणार.
ग्रामसेवक सुनील जाधव यांनी कामाचा हिशोब न देताच मला अतिक्रमणाची नोटीस पाठवली म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुनील मांजरे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली की लवकरात लवकर ग्रामपंचायत गोळवाडी येथील ग्रामसेवकावर मनमानी कारभार करतात म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात अर्ज करण्यात आला व लवकरात लवकर ग्रामसेवकावर कार्यवाही करावी असे ग्रामपंचायत सदस्य सुनील मांजरी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विनंती केली.
Discussion about this post