संजय फलके, शिरूर तालुका प्रतिनिधी
शिरूर :- श्री. डी .एन. ताठे माध्यमिक विद्यालय , कारेगाव तालुका -शिरूर जिल्हा -पुणे या विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुवार ,दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी बालदिन साजरा करण्यात आला.
दिनांक १४ नोव्हेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस दिवस असतो .त्यांना लहान मुले व गुलाबाची फुले फार आवडायची ते कुठेही गेले की लहान मुलांमध्ये लगेच मिसळत . सर्व मुले त्यांना चाचा नेहरू असे म्हणत.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमल झावरे मॅडम यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती .धनश्री करपे – सरोदे ,श्रीमती .कविता धावडे -आढाव ,श्रीमती .दत्तात्रय हिरामण कर्डिले ,श्रीमती. निकिता जाधव ,श्रीमती. स्वाती इंगोले हे शिक्षक व श्री. बाळासाहेब कोहोकडे , श्री.सखाराम चव्हाण, श्री .सतीश सरोदे ,श्रीमती .ज्योती उघडे हे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मनोभावे आदरांजली वाहिली.
Discussion about this post