तालुका प्रतिनिधी: चंद्रकांत भोरे दि. हदगांव (नांदेड)हदगाव विधानसभेची रणधुमाळी सुरू असून निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीचे लोकप्रिय लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांचा सर्वसामान्य जनतेच्या भेटी घेण्यासाठी जनसंवाद दौरा सुरू केला आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा हदगाव विधानसभा मतदारसंघातील हदगाव तालुक्यातील तसेच हिमायतनगर तालुक्यातील वाडी तांडे आदी गावांना भेट देऊन सर्वसामान्य जनतेशी संवाद साधले लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या या जनसंवाद यात्रेस सर्वसामान्य दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्यांक बहुसंख्यांक लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही पदावर नसताना मतदार संघातील कोट्यावधी निधीच्या विकास कामांच्या बळावर आपण या निवडणुकीत सामोरे जात असून सर्वसामान जनतेच्या आशीर्वादाने आपण विजयी होऊ असा आत्मविश्वास लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी जनसंवाद दौऱ्यात व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख विवेक देशमुख. तालुकाप्रमुख संभराव मामा .युवा सेनेचे संदेश पाटील हडसणीकर. माजी सभापती बाळासाहेब कदम. हदगाव शहर प्रमुख बबन माळोदे.
आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांना जनसंवाद दौऱ्यात माय माऊली लाडकी बहीण . वयोश्री महिला. जेष्ठ गावातील प्रथम नागरिक शेतकरी. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गवाही दिली आमदार पदावर नसताना गावातील खूप विकास कामे केली आपला विजय आजच निश्चय आहे या निवडणुकीत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी सहानुभूती जनतेतून व्यक्त केली जाते महायुतीच्या सर्व कल्याणकारी योजनेच्या बाबुराव कदम यांनी विश्लेषण केले शेतकरी. व्यापारी. महिला लाभार्थी. कृषिविषयक. उज्वला गॅस योजना. अदी योजना बद्दल माहिती देण्यात आले . तसेच महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासाठी मतदारसंघ एकवटला असल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post